Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट १४, २०२२

Share Market | "यांच्या" निधनाने शेअर मार्केट कोसळणार? |

मार्केट कोसळणार?

'बिग बुल'ठरले आदर्श, गुंतवणूकदारांमध्ये हळहळ





Maharashtra News
मंगेश दाढे/ नागपूर (Mangesh Dadhe) : जवळपास 35 वर्षांपासून भारतीय शेअर मार्केटवर वर्चस्व प्रस्थापित करणारे राकेश झूनझूनवाला(
Rakesh Jhunjhunwala 
वय 62)यांच्या निधनाने गुंतवणूकदारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांच्या निधनाचा परिणाम शेअर मार्केटवर (stock market) होईल का? हा प्रश्न गुंतवणूकदारांना सतावत आहे. 'बिग बुल'झुनझूनवाला 
Rakesh Jhunjhunwala 
यांच्या निधनाची बातमी शेअर मार्केटसाठी धक्का देणारी आहे. येत्या आठवड्यात बहुतांश शासकीय सुट्ट्या आहेत. तरीही, गुंतवणूकदारांमध्ये चिंता दिसत आहे.तर, झूनझूनवाला यांचे मोठ्या कंपन्यामधील शेअरचा हिस्सा त्यांच्या कुटुंबातील कोणत्या सदस्याकडे जाणार, याकडेही तर्कवितर्क लावले जात आहेत.

भारतीय शेअर बाजारामध्ये 1985 पासून त्यांनी केवळ पाच हजारांची गुंतवणूक करून कारकीर्द सुरु केली होती.सर्वसामान्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून श्रीमंत व्हावे, यासाठी ते प्रयत्नशील होते.
.........................
*श्रीमंतीचे दिले धडे*

झूनझूनवाला जे शेअर खरेदी करायचे त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष असायचे. त्यांनी एखादा शेअरमध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे अभ्यासपूर्वक असायची. परिणामी, अनेकांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन शेअरमधून जीवन सावरले होते. शेअर मार्केट हा काही निवडक लोकांसाठी नसून सर्वांसाठी आहे. यात गुंतवणूक करून सामान्य श्रीमंत होऊ शकतात, हे झुनझुनवाला यांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिलं. 
Rakesh Jhunjhunwala 


.............
Share Market Today - Stock Market and Share Market Live Updates: Get all the latest share market and India stock market news and updates on Moneycontrol.com.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.