Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट ११, २०२०

पत्रकार बांधवांनो, 'हीच ती योग्य वेळ!'

पत्रकार बांधवांनो, 'हीच ती योग्य वेळ!'





गेली अनेक वर्षे श्रमिकांच्या मेहनतीवर गब्बर झालेली माध्यम समूह कोरोना येताच भिकेला लागली. जसा 'कोरोना' चीनमधून विमानात बसून भारताकडे निघाला, तेव्हाच इकडे कार्पोरेट मिडिया हाऊसेसच्या मेंदूत कॉर्स कटिंगच्या विषाणूने टेकऑफ केलं. केंद्र, राज्य सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारून, इथल्या व्यापारी, उद्योजक, राजकीय लोकांनी दिलेल्या जाहिरातीच्या भरवश्यावर अब्जाधीश झालेले हे मिडिया हाऊस अचानकपणे भिकेला लागले. त्यांनी शेकडो कर्मचाऱ्यांना अचानक कमी केलं, काहींना अर्ध पगारी ठेवले. अजूनही काही जात्यात तर काही सुपात आहेत. कंपनीच्या आर्थिक धोरणाबाबत निश्चितच निर्णय घेण्याचे अधिकार मालकांना असले तरी महामारीच्या काळात केली गेलेली ही 'बदमाशी' अमानवीय आणि निंदनीय ठरते. जगाला मानवतेच्या उपदेशाचे डोज पाजणारे चेहरे किती विद्रुप आहेत, हे सर्वांनी पाहिले. असो...!यावर अनेकांनी लिहिले, काहिक बोलले आहेत. काहीनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, त्यांना न्याय मिळेल की नाही तो भाग अलाहिदा!
जे झालं त्याचं रडगाणं गात बसण्यापेक्षा आता नवीन काही केलं पाहिजे, आपल्या स्वप्नांना उभारी देण्याची, स्वतः च्या क्षमता सिद्ध करण्यासाठी *'हीच ती योग्य वेळ'* आहे. काळाची पावले ओळखून आम्ही कामाला लागलो आहोत, अर्थातच ही संधी माझ्यासह विदर्भातील शेकडो पत्रकार, मीडिया कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राला सुपरिचित जेष्ठ संपादक, वक्ते, लेखक आणि विचारवंत *पुरूषोत्तम आवारे पाटील* यांनी *'अजिंक्य भारत'* या दैनिकाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. संकटकाळात बेरोजगार पत्रकारांना मोठा आधार त्यांनी दिला आहे. त्यांच्या पुढाकारातून श्रमिक पत्रकारांचं 'पहिलं मीडिया हाऊस' विदर्भातील अकोल्याला उभं होतं आहे. विदर्भाच्या मातीतून एकाधिकारशाही, भांडवलशाही व्यवस्थेच्या विरोधात हा एक प्रकारे *सर्जिकल स्ट्राइक* आहे.
'ना कुणाचा अजेंडा, ना कुणाला गंडा' हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामाला लागलो आहोत. लोप पावत चाललेली सच्ची, सकस, शोध पत्रकारिता, सामाजिक बदल , न्याय आणि विकासासी बांधील पत्रकारिता करण्याची चांगली नामी संधी *आवारे सरांनी* आपल्याला दिली आहे. सोबतच अजिंक्य भारत परिवारामध्ये महाराष्ट्रातील जेष्ठ संपादक- पत्रकार, नामवंत, विचारवंत जुळले आहेत, ते पत्रकारितेच्या बाराखडी सोबतच जाहिरात मार्केटिंग, ऑनलाईन, डिझिटल, टीव्ही, इव्हेंट या सर्व प्रकारचं प्रशिक्षण देवून खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर पत्रकारांची फळी घडविण्यासाठी सज्ज आहेत. आपली कोणत्याही दैनिकाशी स्पर्धा नाही. कुणाबद्दल आकस, द्वेष आणि वैरभाव नाही. ही फक्त स्वतः ला घडविण्याची संधी मी मानतो. आपणही या निडर, प्रामाणिक पत्रकारितेत सहभागी होवून आमच्या प्रयत्नांना बळ द्याल ही अपेक्षा....!


( क्रमशः)

- श्रीधर ढगे,
वरिष्ठ उपसंपादक,
अजिंक्य भारत
94 2323 7001

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.