लतादीदींच्या अकस्मात निघून जाण्याची वार्ता कळली आणि मी अस्वस्थ झालो. एक मायाळू दीदी म्हणून लतादीदींचे स्थान माझ्या हृदयात कायम कोरले गेले. लतादीदींची आणि माझी पहिली भेट मुंबईतील वरळी चौकात एनकेपी साळवे यांच्या समवेत कारमध्ये झाली. त्यानंतर लतादीदींचा सोबत अनेकदा भेटण्याचा योग आला. त्यापैकी माझ्या निवासस्थानी त्यांनी दिलेली सदिच्छा भेट मला अविस्मरणीय ठरली. खासदार दत्ता मेघे यांच्या निवासस्थानावरूनच त्या माझ्या घरी आल्या होत्या.
पुढे जगदीश खेबुडकर व सुरेश भट यांनी लतादीदींच्या माध्यमातून आई अनसूया मातेचे गीत गाण्याची सूचना केली. मात्र दीदींनी उषा मंगेशकर, सुरेश वाडकर यांची नावे सुचविली आणि त्यानुसार गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. लहानपणी माझा संकल्प होता की आयुष्यात लतादीदींना भेटण्याची मनोकामना मी एक दिवस नक्कीच पूर्ण करणार आणि आणि माझी मनोकामना पूर्ण झाली. लता दीदींनी गायिलेली प्रेमस्वरूप आई, मोगरा फुलला, जन पळभर म्हणतील हाय हाय, एका तळ्यात होते अशी अनेक गाणी आजही माझ्या ओठांवर सहज उमलतात. लता दीदींच्या जाण्याने संगीतक्षेत्र पोरके झाले, सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आणि माझी कृपाळू आई गेली.
मी गानसम्राज्ञी लतादिदींना माझ्या पक्षातर्फे आणि परिवारातर्फे भावपूर्ण आसवांजली अर्पण करतो.
दिलीप पनकुले
(प्रदेश चिटणीस)
#latamangeshkar #smruti