सावली/तालुका प्रतिनिधी
सावली तालुक्यातील आरोग्य वर्धिनी केंद्र अंतरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरज म्हस्के यांची अवघ्या चार महिन्यात बदली झाल्याने अंतरगावात राजकीय तणाव निर्माण झाला आहे.
सावली तालुक्यात सर्वात मोठे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र अंतरंगाव येथील रुग्ण कल्याण समितीचे विद्यमान अध्यक्ष तथा या क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य यांनी रुग्ण कल्याण समितीच्या खात्यातून स्वतःच्या नावे को. ऑप. बँक अंतरंगाव येथून 32000/-रुपये उचल केल्याचे माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीतून उघड झाली होती. त्या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी होत असताना डॉ. सुरज म्हस्के यांची प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली. यावरून राजकीय खलबत्ते झाल्याची शक्यता भाजपचे पूनम झाङे यांनी यांनी व्यक्त केली आहे.
सावली तालुक्यातील अंतरगाव आरोग्य वर्धिनी केंद्रात एक अनुभवी आणि कार्यतत्पर डॉ. सुरज म्हस्के वैद्यकीय अधिकारी म्हणून अल्पावधीतच नाव मिळविले.
रात्रंदिवस रुग्णाच्या उपचारासाठी बाजी लावून संपूर्ण अंतरगाव परिसरातील जनतेचे मन जिंकल्याने कुणाच्या तरी मनात खुपत होते. तडकाफडकी प्रतिनियुक्ती झाल्याने परिसरातील ग्रामीण जनतेत नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे
कोरोना कोविड 19 चे कारण सांगून क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती रद्द करण्यात यावी, यासाठी सावली तालुक्याचे तहसीलदार गावकऱ्यांनी निवेदन दिले. परीसरातील 15 सरपंच पैकी उपस्थित 10 सरंपचानी निवेदन दिले आहे.