Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, जुलै १५, २०२३

पाणीपुरी खाताय तर ही काळजी घ्या! #Panipuri #nagpur #health

पाणीपुरी खाताय तर ही काळजी घ्या! #Panipuri #nagpur #health

आपल्या पाणीपुरीची बातच काही और आहे. मस्त चटपटीत, थोडी आंबट, थोडी गोड, कधी तिखट अश्या अनेक चवींचे सुख कुठल्या पदार्थात एकत्र अनुभवयाला मिळत असेल तर तो पदार्थ म्हणजे पाणीपुरी. (panipuri kashi tayar hote)



पाणीपुरी... कदाचितच कोणी असेल ज्याला पाणीपुरी (Pani Puri) आवडत नसेल. पाणीपुरी हे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं. अनेकदा रस्त्यावरून जाताना एखादा पाणीपुरीचा (Golgappa) ठेला दिसला तर पाय तिथेच थबकतात. बऱ्याचदा पाय आपसूकच तिकडे वळतात. सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे अनेकजण पाणीपुरी खाताना आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. Pani puri game on Google Doodle: How to play, tips to increase score

घरच्याघरी सोप्या पद्धतीने बनवा पाणीपुरी | पाणी पुरी - YouTube





पाणीपुरी खरंच आरोग्यासाठी घातक आहे का? याचा विचार तुम्ही केलाय का? पावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे अनेकदा आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. असावेळी जर तुम्ही बाहेरचे पदार्थ खाणं टाळत असाल, तर तुम्ही हा पदार्थ घरीही तयार करून खाऊ शकता. चला तर आज नागपूरच्या पाणीपुरीवर आज जाणून घेऊया. 

दिवस उगवला की नागपूरचा तरीपोहा आणि दिवस मावळतीला गेला की नागपूरची पाणीपुरी फेमस आहे. हे दोन पदार्थ न खाल्लेले व्यक्ती तुम्हाला शोधूनही सापडणार नाहीत. कारण या दोन पदार्थांची चवच न्यारी आहे. या पाणीपुरीची महती गुगल पर्यंत पोचली आहे. दोन दिवसाआधीच  गुगलने पाणीपुरी संदर्भातील डुडल सर्च इंजिनवर ठेवले आहे. 


पण लक्षात ठेवा आता पावसाळ्याचे दिवस लागलेत. त्यामुळे आरोग्याची देखील काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे तुम्ही पाणीपुरी खाताय ना... म्हणून ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. 


नागपुरातील पाणीपुरी इतकी फेमस आहे की अनेक तरुण तरुणी भैय्याच्या ठेवल्यावर घोळका घालून दिसतात. आता काल परवाचीच गोष्ट नर्सिंग ला  शिकणारी काही विद्यार्थिनीनी पाणीपुरी खाण्यासाठी गेली. नेहमीप्रमाणे तिने पाणीपुरी खाल्ली ही. पण अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि यातील एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. शिवाय तिच्या दोन मैत्रिणी उपचार घेत आहेत. हा प्रकार नेमका पाणीपुरीतील दूषितपणामुळे घडला की आणखी काही कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र पाणीपुरी खाताना स्वच्छता फार महत्त्वाची असते. सध्या पावसाळी दिवस असल्याने स्वच्छता पाळणे फार महत्त्वाचे आहे आणि उघड्यावरचे पदार्थ देखील खाताना आपण काळजी घेतली पाहिजे.




< p>पाणीपुरी बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर ते दूषित होऊ शकतात. अशा परिस्थितीत पाणीपुरी खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात ज्यात टायफॉइड, लूज मोशन, डायरिया यांचा समावेश आहे.


पाणीपुरी खात असाल तर खबरदार... तुम्ही खात असलेल्या पाणीपुरीमुळे टायफॉइडला निमंत्रण देऊन घरी घेऊन जात तर नाहीत ना? पाणीपुरीचे पाणी दूषित असेल तर तुम्हाला टायफॉइड होण्याचा धोका आहे. पाणीपुरी विक्रेता, हॉटेलमध्ये अन्न पदार्थ तयार करणारा अथवा वाढणाऱ्या व्यक्ती टायफॉइड जंतूचा वाहक असेल तर तुम्हालाही टायफॉइड अर्थात विषमज्वराची लागण होऊ शकते.

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, कॉलरासोबतच टायफॉइडची साथही वाढीस लागते. टायफॉइड जंतूचे वाहक असलेल्या व्यक्तीच्या हस्ते खाद्यपदार्थ सेवन केले अथवा दूषित पाणी सेवन केल्यामुळे टायफॉइड होतो. या आजारात सुरुवातीला ताप येण्यास सुरुवात होते. यानंतर हगवण लागते. टायफॉइडच्या रुग्णाचा ताप वाढत असतो. यामुळे रुग्ण अत्यंत कमकुवत होतो. तापेच्या रुग्णाला टायफॉइडची लागण झाली अथवा नाही, हे पाहण्यासाठी विडाल चाचणी करावी लागते. सुरुवातीला आठ दिवस ताप असलेल्या रुग्णालयाच्या रक्तनमुन्याची चाचणी टायफॉइड पॉझिटिव्ह येत नाही. असे असले तरी डॉक्टर रुग्णाला टायफॉइडची लक्षणे दिसत असल्यास टायफॉइडचेच औषधोपचार सुरू करतात. यामुळे रुग्ण लवकर बरा होतो. तापेवरील औषधी टायफॉइडच्या उपचारासाठी उपयुक्त ठरत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


How To Make Pani Puri Masala At Home | पाणीपुरीचा मसाला ...

How To Make Pani Puri Masala At Home | पाणीपुरीचा मसाला ...

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.