Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट ३१, २०२३

Health News : टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती नसतील

 टोमॅटो हे एक (सिट्रस) लिंबूवर्गीय फळ आहे. ज्यामध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन ए, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के मुबलक प्रमाणात आढळतात.

टोमॅटोमध्ये पोटॅशियम आणि मॅगनीज भरपूर प्रमाणात असतात. तसेच कॅल्शियम, आयर्न, कॉपर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक या सारखे भरपूर तत्व असून त्यात अँन्टीऑक्सिडेंट गुण ही आढळतात.

प्रत्येक घरात हमखास टोमॅटो भाजी, आमटी, ते कोशिंबीर, चटणी, टोमॅटो सुप एवढंच काय तर काही लोकं मांस, मच्छी, अंडी यामध्ये सुध्दा आवर्जून वापर करतात.

त्यामुळे टोमॅटो हे स्वयंपाक घरातील एक महात्वाची फळभाजी म्हणून पाहिलं जातं. टोमॅटोचे खाण्याचे विशेष म्हणजे ती एक अनेक गुणकारी फायदे देणारी फळभाजी आहे.

जर छोट्या मोठ्या आजारात आपल्या तोंडाची चव गेली असेल तर टोमॅटोची चटणी खाल्ल्याने आपल्या तोंडाला चव तर येतेच वरून दोन घास जास्तच खाल्ले जातात.


रोज टोमॅटो खाण्याचे फायदे :-

  • व्हिटामिन-सी त्वचेसाठी भरपूर फायदेशीर असते. आणि सुर्य प्रकाशापासून त्वचेला संरक्षण करण्यासाठी खुप उपयुक्त आहे.
  • हृदयसंबंधित रोगांपासून बचाव होतो.
  • युरीन इन्फेक्शनपासून बचाव करते. तसेच रक्तशुध्दी ही होते.
  • पचनशक्ती वाढवते, पालकच्या रसात टोमॅटोचा रस मिसळून पिल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.
  • टोमॅटो मध्ये असलेल्या व्हिटामिन के मुळे हाडे मजबूत होतात. तसेच बोनटिश्यु रिपेअर होण्यास मदत होते.
  • टोमॅटोचा एक तुकडा आपल्या चेह-यावर घासून लावल्याने आपल्या चेह-यावर चमक येऊन कोरडी त्वचा मुलायम होऊन मॉइश्चराइज होते.
  • टोमॅटो आपल्या चेह-यासाठी इतके प्रभावी आहे की तुम्ही सतत आपल्या चेह-यावर वापरालात, तर तुम्हाला महागड्या सनस्क्रीन क्रीमची आवश्यकता भासणार नाही.
  • तेलकट त्वचेसाठी टोमॅटो एक उत्तम औषध आहे. त्वचेला धूळ, मातीच्या नुकसानी पासून सुरक्षित ठेवते. आणि त्वचेला उजल ही बनवण्यासाठी टोमॅटो खुप उपयोगी आहेत.
  • टोमॅटोचे नियमित सेवन केल्याने आपले डोळ्यांची चमक आणि सौंदर्य वाढवते. तसेच त्यात असलेल्या व्हिटामिन ए मुळे डोळ्यांचा प्रकाश वाढवते. आणि डोळ्यांचे स्नायू बळकट करते. तसेच डोळ्यांच्या डिहायड्रोजनसाठी उपयोगी पडते.
  • तसेच टोमॅटो आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
  • केसांना चमकदार आणि मजबूत करण्यासाठी टोमॅटो भरपूर फायदेशीर आहेत.
  • बिया नसलेल्या टोमॅटोचा सॅलडमध्ये वापर केल्याने किडनी
  • स्टोनची शक्यता कमी होते.
  • आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आणि ताणतणावापासून दूर रोखण्यासाठी टोमॅटो खुपच लाभदायक आहेत.
  • स्मोकिंगमुळे शरीराला होणा-या नुकसानीपासून वाचवण्यासाठी टोमॅटो सेवन फायदेशीर आहे.

 टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो जे आपल्या आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे. आणि याच कारणांमुळे कच्चा टोमॅटो पिकल्यामुळे अजून प्रभावशाली ठरतो.

टोमॅटोमध्ये कार्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असते. यामुळे हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह या विकारांवर खुपच गुणकारी व फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यासाठी सकाळी एक टोमॅटो खाल्ले तर बराच वेळ भूक लागत नाही. आणि पोट भरल्यासारखे ही वाटते.

तर असे टोमॅटोचे अनेक फायदे आहेत. बहुतेक सर्वांनाच माहित नसतात. पण आता मला वाटते, सर्वानाच माहित पडले असेल. 


What are the benefits of eating tomatoes?


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.