Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर २०, २०२२

चंद्रपूर | 34 नमुने हत्तीरोगाच्या संक्रमणाने दुषित आढळले Filariasis symptoms, causes, prevention & treatments information

 जिल्ह्यात अतिरिक्त हत्तीरुग्ण संक्रमण सर्वेक्षणाला सुरुवात

Ø अत्याधुनिक एफ.टि.एस किटव्दारे होणार रक्त नमुने तपासणी





चंद्रपूर, दि. 19: चंद्रपुर जिल्हा हा हत्तीरोगासाठी अतिसंवेदनशिल जिल्हा आहे. जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरणासाठी सन 2004 पासुन सार्वत्रिक औषधोपचार मोहिम दरवर्षी राबविण्यात येते. सदर मोहिमेची फलश्रृती म्हणुन जिल्हयात नविन हत्तीरुग्ण संक्रमणाची संख्या कमी होत आहे.

संक्रमण पडताळणीच्या टप्प्यात जिल्हयातील 11,700 नागरीकांचे 16 डिसेंबर 2022 पासुन एफ.टि.एस किटव्दारे रक्त नमुने तपासणी करण्यास सुरुवात झाली आहे. चिमुर व सिंदेवाही तालुका वगळुन प्रत्येक तालुक्यातुन 3 ठिकाणावरुन 900  रक्तनमुने या किटद्वारे तपासायचे आहे. हि तपासणी 20 वर्षावरील नागरीकांची करावयाची असुन ती दिवसाच केली जात आहे.

जिल्हयात हत्तीरोगाच्या संक्रमण पडताळणीकरीता सर्व तालुक्यात हत्तीरोगाच्या संक्रमणाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. जिल्हयातील सर्व तालुक्यातून एकुण 9000 रात्र रक्त नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 34 नमुने हत्तीरोगाच्या संक्रमणाने दुषित आढळुन आले असुन सर्व दुषित रुग्णांना औषधोपचार करण्यात आला आहे. या सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक रुग्ण हे चिमुर व सिंदेवाही तालुक्यातील असल्याचे तपासणीअंती निदान झाले.

एफ.टि.एस किट ही अत्याधुनिक प्रकारची किट असुन महाराष्ट्र शासनाकडुन हि किट पुरविण्यात आली आहे. सदर उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच केल्या जात आहे. सदर किटच्या वापरासंदर्भात जिल्हा परिषद, चंद्रपूर येथील दादासाहेब कन्नमवार सभागृहात सर्व आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा वैद्यानिक अधिकारी यांची एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून आरोग्य सेवा (हिवताप) नागपुरचे सहाय्यक संचालक डॉ. निमगडे, जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. भाग्यश्री त्रिवेदी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. बोरकर उपस्थित होते. सदर सर्वेक्षणादरम्यान येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास सर्वतोपरी सहकार्य करुन आपली तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत यांनी केले आहे.


Filariasis symptoms, causes, prevention & treatments information


हत्तीरोग ( लिम्फॅटिर फायलेरियासिस (एलएफ)) हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय (अवयव)ˌ वृषण हे आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणेही अवघड होवून बसते. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो.


डास चावल्याबरोबर लगेचच या आजाराची लक्षणे दिसून येत नाही. डासामार्फत जंतू शरीरात शिरल्यानंतर हत्तीरोगाची लक्षणे दिसण्यासाठी 8 ते 16 महिने एवढा कालावधी लागत असतो. संबंधित व्यक्तीच्या शरीरामध्ये जंतूची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर या आजाराची लक्षणे जाणवू लागतात. हत्तीरोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात.


  • हातपाय, जननेंद्रिय व अन्य अवयवांवर सूज येणे,
  • ताप येणे,
  • हुडहुडी भरणे,
  • लसीकाग्रंथीना सूज येणे अशी लक्षणे या रोगात दिसतात.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.