Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट ३१, २०२२

रात्री उशिरापर्यंत जागरण करणे हे शरीरासाठी चांगले असते का वाईट?

जागरणामुळे एसीडीटी होते, एसीडीटी मुळे डायबिटीस होतो. डायबिटीस मुळे अनिद्रा, ब्लड प्रेशर होतो. पुढे केंन्सर सारखे आजार होतात.

जागरणामुळे गेसेस, अपचन, बद्धकोष्ठता, मलावरोध होतो. पुढे भगंदर, मूळव्याध होतो. जागरणामुळे मानसिक आजार होतात, जसे डिप्रेशन, फोबिया इत्यादि.

जागरणामुळे सतत चिडचिडेपणा राग येणे. दुसरा जे बोलतो आहे तिकडे लक्ष नसणे असे होते ज्यामुळे माणूस हिंस्त्र व आक्रमक होतो. पुढे मारामारी करणे नकळत खून करणे इतका तो विकृत होतो.

जागरणामुळे कशातच मन लागत नाही. बेचैनी येते त्यामूळे सर्व काही असून हरलेली मानसिकता येते याचे पर्यावसान आत्महया करण्या पर्यंत होते.

गम्भीर बाब अशी की हे सर्व अत्यंत धीम्या गतीने होते त्या मुळे त्याचे गाम्भीर्य कुणाचाच लक्षात येत नाही.

आता तुम्ही ठरवा जागरण चांगले की वाईट? health-tips-know-the-best-5-foods-to-sleep-better


चांगल्या झोपेसाठी या गोष्टी खा

बदामाचे दूध प्या :



रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे दूध प्या, तुम्हाला चांगली झोप मिळेल. बदामाचे दूध कॅल्शियमचे उत्कृष्ट स्त्रोत आहे, जे मेंदूला मेलाटोनिन तयार करण्यास मदत करते. मेलाटोनिन हा हार्मोन आहे जो झोपेच्या चक्राचे नियमन करण्यास मदत करतो.


मध आणि केळीचे सेवन करा:
रात्री झोपताना एक चमचा मध घ्या. तसेच, मध्यभागी एक केळी कापून त्यात एक चमचा जिरे शिंपडा. रात्री नियमितपणे या गोष्टींचे सेवन केल्यास तुम्हाला चांगली झोप मिळेल.
झोपण्यापूर्वी कॉफी नकोच

रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पिण्याची सवय अनेकांना आहे. कॉफी मेंदूवर उत्तेजक प्रभाव टाकते. रात्रीपाळीवर असलेल्या सैनिकाप्रमाणेच कॉफीमुळे मेंदू अलर्ट होतो आणि झोप गायब होते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कँफिन किंवा मादक द्रव्य नकोच.
झोपेची वेळ निश्चित नसणे

तुमच्या झोपण्याच्या वेळा दररोज बदलतात काय? याचे उत्तर जर होय असेल तर ही सवय तुमच्या शरीराला अपायकारक आहे. त्यामुळे जसा तुमच्या कामाचे वेळापत्रक असते. अगदी तसेच तुमच्या झोपण्याची वेळ नक्की करावी लागेल
रात्री स्नँक्स ?

रात्री झोपताना भूक लागणे म्हणजे विचार करण्यासारखे आहे. जेव्हा तुम्ही रात्री उशीरापर्यंत टीव्ही- मोबाइल बघता तेव्हा तुम्हाला भूक लागते. ही सवय रात्रीच्या नाश्त्यात बदलत असेल तर ते अजून घातक ठरते. झोपण्यापूर्वी काही अपायकारक खाल्ल्याने शरीरावर सूज, गँसेस, अपचन होते आणि तुमची उर्वरित झोप खराब होते.
रात्री उशिरापर्यंत जागरण-

जागरण करण्याची सवय फिटनेसवर खूप जास्त परिणाम करते. लॉकडाउनमध्ये अनेकांनी जागरण सुरू केले. म्हणजे नेटफ्लि्क्स आणि हॉटस्टारवरचे अॉनलाइन शोजची मागणी वाढली. दिवसा वेळ मिळत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी हे कार्यक्रम बघणे अनेकांना सोईचे वाटत असल्याने रात्री उशिरापर्यंत मोबाइल- टीव्ही पाहला जातो. साहजिकच तुमच्या रूटीनवर याचा परिणाम होतो. सतत स्क्रीनच्या निळ्या प्रकाशाच्या संपर्कात आल्यानंतर झोप खराब होते. त्यामुळे जागरणाच्या या सवयीवर नियंत्रण आणायलाच हवे. health-tips-know-the-best-5-foods-to-sleep-better
ब्रश न करणे

तुम्हाला हे माहिती नाही पण दातांची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. दिवसभरात केवळ एकदा दात घासणे पुरेसे नाही. दिवसातून कमीत कमी दोनवेळा ब्रश करा असे तज्ज्ञ सांगितात. स्वस्थ, चमकदार आणि मजबूत दातांसाठी दात स्वच्छ करणे आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी दात घासा आणि बघा तुम्हाला चांगली झोही येईल.

या सवयींपैकी काही सवयी किंवा हेच तुमचे रूटीन असेल तर या सवयी आजच बदला. या सवयी केवळ तुमच्या शरीरावर ताण आणत नाही तर अनेक आजारांना निमंत्रण ठरू शकते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी मन शांत ठेवा आणि चांगली झोप घ्या.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.