हरितालिका विवाहित महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा सण आहे. या दिवशी विवाहित स्त्रिया पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी निर्जला व्रत करतात. या दिवशी भगवान शंकरासोबत माता पार्वतीचीही पूजा केली जाते. आज चंद्रपूर शहर आणि ग्रामीण भागात सर्वत्र हरितालिका पूजा उत्साहात साजरी करण्यात येत आहे. गौरी विजसरणासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून ठिकठिकाणी कुंड ठेवण्यात आले होते .
सुख, समृद्धी आणि सौभाग्य लाभो या कामना करत महिला आज ३० ऑगस्ट रोजी हरतालिका तीजचा सण साजरा करत आहेत. या दिवशी विवाहित स्त्रिया आणि अविवाहित मुली व्रत पाळतात, भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतात. या दिवशी महिला ह्या पुर्ण दिवस उपवास करुन फक्त फळाहार घेतात.
Hartalika 2022 Puja Muhurt
गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी साजरा होणारा सण चंद्रपूर जिल्ह्यात विवाहित हिंदू स्त्रिया गौरी पूजन साजरा करतात. गौरीची घटस्थापना करून आज पूजा करण्यात आली आणि जवळच्या नदी किंवा तलावामध्ये विसर्जन देखील करण्यात आले. महिलतर्फे विधीवत पुजन करण्यात आली. “जन्मोजन्मी हाच पती मिळो” अशी रास्त हाक महिलांनी महादेवाकडे हरितालिका पुजन करते समयी केली. शहरातील रामाला तलाव, झरपट नदी येथे परिसरातील महिला येऊन विधीवत पुजन केली. अतिशय भक्तीमय अशा वातावरणात पुजन करण्यात आले.
hartalika puja vidhi