Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, डिसेंबर २१, २०२२

Corona virus ने पुन्हा थैमान घातले; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

नागपूर : देशासह जगात अनेक ठिकाणी कारोना व्हायरस (Corona virus) ने पुन्हा थैमान घातले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ व्हायला लागली होती. रुग्णालय पुन्हा एकदा कोविड रुग्णांनी खचाखच भरायला लागली असून, मृत्यूच्या संख्येमध्ये पुन्हा वाढ व्हायला लागली आहे. तर राज्यात (Maharashtra) देखील कोरोना विषाणू उफाळून आला आहे. अशा परिस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

Corona virus ने पुन्हा थैमान घातले; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली मोठी घोषणा
covid

देशासह राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोविड रुग्णसंखेत वाढ होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात करून नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्स नेमण्यात येणार आहे. ही टास्क फोर्स राज्यातल्या कोरोना स्थितीबद्दल सरकारला सूचना देत राहील. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, पुन्हा निर्बंध, पुन्हा मास्क, पुन्हा लॉकडाऊन का? असा प्रश्न जनतेसमोर उपस्थित झाला आहे.

टास्क फोर्स राज्यातल्या कोरोना परिस्थितीबाबत सरकारला सूचना करणार आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली आहे. त्यामुळे आता पुन्हा निर्बंध लागणार, पुन्हा मास्क लावावा लागणार का, असा प्रश्न जनतेसमोर आहे.तर चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारही सतर्क झालं आहे


आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्ण संख्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 2 नोव्हेंबर रोजी जगभरात 3.3 लाख कोविड रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली होती. त्यानंतर या संख्येमध्ये सातत्याने वाढ होत गेली. हा आकडा डिसेंबर 18 नंतर 5.1 लाखांवर पोहोचला आहे.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालेले आहे. सरकारकडून सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवण्यात आले आहे. दरम्यान, आज केंद्रीय स्तरावर याबाबत बैठक होणार असून, निर्बंध बद्दलची माहिती त्यानंतर समोर येऊ शकते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.