चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील पारंपारिक बांबूपासून वस्तू बनविण्याच्या कलेला आधुनिक स्वरूप देणाऱ्या चिचपल्लीच्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने लॉकडाऊनच्या काळात वर्क फॉर्म होम सुरू केले आहे. या केंद्राच्या अनेक प्रशिक्षणार्थी व शेकडो महिलांना यामुळे अर्थाजन होणार आहे.
कौशल्याला व्यवसायिक बनविण्याच्या कार्यात आपला राज्यभर ठसा उमटवणाऱ्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रात लॉकडाऊन मुळे काम बंद पडले होते. या केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी यासाठी पुढाकार घेत वर्क फॉर्म होम सुरू करण्याचे ठरविले.त्यामुळे चंद्रपूरच्या अनेक गावांमध्ये लॉकडाऊनच्या काळातील सामाजिक दुरी व संचार बंदीचे सर्व नियम पाळत बांबूपासून विविध वस्तू बनविण्याला सुरुवात झाली आहे.
येथील बांबू कारागीर महिला व पुरुष यांनी कोरोनाची दहशत असताना आपण आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न होता. यावर भारतीय वन सेवेचे अधिकारी व या केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी ही संकल्पना समोर आणली. त्यामुळे बांबू कारागीर यांना आपले कौशल्य वापरून कुटुंबाचे उदरनिर्वाह करण्याची संधी मिळाली. बांबू वस्तू बनवण्याचे कौशल्य घेतलेल्या कारागिरांनी या संधीचा सदुपयोग केला. शासनाच्या नियमानुसार तोंडाला मास्क व सामाजिक अंतर ठेऊन कारागिरांनी दिवसाच्या लक्षांनुसार आपल्या घरीच बांबूच्या वस्तू बनविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार हे काम सुरु झाले आहे.
बांबू की-चैन, बांबू तलवार ,बांबू राखी, बांबू गणपती , बांबू चटई ,पासून आकाश दिवा, बांबू झेंडा आदी कलात्मक बांबू वस्तू त्यांनी तयार केल्या. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राने लॉकडाऊनच्या काळात बचत गटातील महिलांना पण भारतीय सणानुसार बांबू राखी, बांबू गणपती, बांबू झेंडे, दिवाळी करीता आकाश दिवे, मकरसंक्रात करीता भेट वस्तू इ. कामाचे नियोजन करण्यात आले आहे.
वर्क फॉर्म होम या संकल्पनेतून 5 तालुक्यातील सामुहिक उपयोगिता केंद्रातील महिलांना देखील काम दिले जाणार आहे. वरील सर्व कामे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे वन परीक्षेत्र अधिकारी एस. एन. मंतावार यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे. तसेच या मोहिमेसाठी पर्यवेक्षक योगिता साठवणे, हस्तशिल्प निर्देशक किशोर गायकवाड,सहा. मशीन निर्देशक गजेंद्र देऊळकर काम करीत आहेत.