Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जून ३०, २०१९

विजय वडेट्टीवारांना ओबीसी महासंघाचा विरोध





चंद्रपूर, गडचिरोली , यवतमाळ , नंदूरबार , धुळे , नाशिक व पालघर या जिल्हयातील ओबीसी संवर्गाचे आरक्षण पुर्ववत 19 % करण्यात यावे

नागपूर/प्रतिनिधी:

विजय वडेट्टीवार (विरोधी पक्षनेता) यांनी सदनात असे निवेदन केले की विदर्भातील प्रामुख्याने भंडारा , गोंदीया , चंद्रपुर , व गडचिरोली या जिल्यातील कुणबी समाजाचा एस ई बी सी मध्ये समावेश करावा. ही मागणी अथवा निवेदन वस्तुस्थितीला धरून नसुन त्यांनी भावनेच्या आवेषात केलेले असावे असे वाटते . या त्यांच्या विधानाशी विदर्भातील कुणबी समाज व ओबीसी समाज सहमत नाही, असे स्पष्टीकरण ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी दिले


महाराष्ट्र शासनानी एस ई बी सी यांना 16 % आरक्षण लागू केले त्याचप्रमाणे खुल्या संवर्गातील आर्थिकदृष्टया मागासलेल्या प्रवर्गासाठी 10 % आरक्षण लागू केले यामुळे आरक्षणाची पुर्वी लागु असलेली 50 % आरक्षणाची मर्यादा संपलेली आहे . महाराष्ट्र राज्यात चंद्रपुर , गडचिरोली , यवतमाळ , नंदुरबार , धुळे , नाशिक , व पालघर या आदिवासी जिल्यागध्ये ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करण्यात आलेले आहे . त्याचवेळी नव्याने घोषीत करण्यात आलेले एस ई बी सी व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या संवगीला दिलेले अनुकर्म 16 % व 10 % आरक्षण पुर्णपणे देण्यात आलेले आहे . हा ओबीसी सवर्गावर अन्याय आहे . नव्याने नवीन संवर्ग तयार करून दिलेल्या आरक्षणामुळे आता 50 % आरक्षणाची मर्यादा राहलेली नाही . त्यामुळे ओबीसी संवर्गाचे उपरोक्त जिल्यात कमी करण्यात आलेले आरक्षण पुर्ववत 19 % । करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण राहु शकत नाही . 

या निवेदनाव्दारे राष्ट्रीय ओबीसी महासंघ सरकारकडे विनती । करते की चंद्रपूर , गडचिरोली , यवतमाळ , नंदुरबार , धुळे , नाशिक , व पालघर या जिल्यात ओबीसी संवर्गाचे कमी करण्यात आलेले आरक्षण पुर्ववत 19 % करून ओबीसी संवर्गास न्याय मिळवून दयावा , अन्यथा महाराष्ट्रातील संपुर्ण ओबीसी समाजास आंदोलनाची भूमिका घ्यावी, असा इशारा सचिन राजूरकर , डॉ . अशोक जिवतोडे , शरद वानखेडे , संजय पन्नासे , गुनेश्वर आरीकर , शकील पटेल , रोशन कुमलकर , निलेश कोढे , मयूर वाघ , राजू गोसावी , सुषमा भड , रेखा बारहाते , सचिन वांढरे, भैय्याजी रडके , पंकज पांडे , राजु खडसे , राजू हडप , प्रविण घोसेकर यांनी दिला. 



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.