Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मे २०, २०१९

महानिर्मितीच्या इतिहासात प्रथमच १०००० मेगावाट पार वीज उत्पादन

राज्यभरातील विविध वीज केंद्रांमधून रेकोर्ड १००३४ मेगावॅट इतके वीज उत्पादन

औष्णिक वीज उत्पादन -  ७५७७ मेगावॅट
वायू वीज उत्पादन – २७० मेगावॅट
जल विद्युत उत्पादन – २१०० मेगावॅट
सौर वीज उत्पादन ११९ मेगावॅट

 नागपूर/प्रतिनिधी:
 २० मे २०१९ रोजी दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी महानिर्मितीच्या राज्यभरातील विविध वीज केंद्रांमधून रेकोर्ड १००३४ मेगावॅट इतके वीज उत्पादन घेण्यात आले. महानिर्मितीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

यामध्ये औष्णिक विद्युत केंद्राचे वीज उत्पादन ७५७७ मेगावॅट, ज्यात नाशिक ५६१ मेगावॅट, कोराडी १५०० मेगावॅट, खापरखेडा ९५१ मेगावॅट, पारस ४५० मेगावॅट, चंद्रपूर २५५० मेगावॅट, भुसावळ ९६७ मेगावॅट तर उरण वायू विद्युत केंद्र २७० मेगावॅट, सौर ऊर्जा ११९ मेगावॅट व जल विद्युत केंद्रांपासून २१०० मेगावॅट वीज उत्पादन घेण्यात आले. 

राज्यात सर्वदूर कडक उन्हाळा असून विजेची एकूण मागणी २२३०० मेगावॅट पोहोचली असून राज्याचे वीज उत्पादन १७३३७ मेगावॅट (खाजगी वीज उत्पादनासह) इतके आहे. सुमारे ५३५७ मेगावॅट वीज केंद्राच्या वाट्यातून घेण्यात येत आहे. 

महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. अरविंद सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक(संचलन) श्री. चंद्रकांत थोटवे यांचे कुशल नेतृत्वाखाली सर्व कार्यकारी संचालक व महानिर्मितीच्या औष्णिक, वायू, सौर व जल विद्युत केंद्रातील सर्व संबंधित मुख्य अभियंते व त्या अंतर्गत कार्यरत अधिकारी, विभाग प्रमुख, अभियंते, तंत्रज्ञ, कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांची हि फलश्रुती असल्याचे संचालक(संचालन) श्री. चंद्रकांत थोटवे यांनी सांगितले. 

१००३४ मेगावॅट  ऐतिहासिक रेकोर्ड वीज उत्पादनाबद्दल सर्व संबंधित कुशल मनुष्यबळाचे संचालक (संचलन) श्री. चंद्रकांत थोटवे यांनी अभिनंदन केले आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.