- आर या पार च्या लढ्यासाठी सज्ज व्हा
- शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांचे आवाहन
टिईटीग्रस्त शिक्षकांची सभा आज (दि.18) कमल काॅन्व्हेंट शेष नगर नागपूर येथे पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते व माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री मिलिंद वानखेडे, कमल काॅन्व्हेंटचे संचालक श्री गायकी सर, विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरचे विभागिय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक संघटक राजू हारगुडे, ग्रामिण जिल्हा संघटक गणेश खोब्रागडे उपस्थित होते.
17 जून पासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. हे अधिवेशन निर्णायक असल्याने राज्यभरातील 10 हजार टिईटीग्रस्त शिक्षकांचा प्रश्न सोडविण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा घेत टिईटीग्रस्त शिक्षकांनी आक्रमक लढा उभारावा व आर पार च्या लढ्यासाठी सज्ज व्हावे, असे परखड आवाहन शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांनी केले. टिईटीग्रस्त शिक्षकांची 6 जून रोजी उच्च न्यायालय नागपूर येथे पूर्ण पिठासमोर सुनावणी होणार असून, आलेल्या निकालाचा सम्मान करीत न्यायासाठी अधिक जोमाने प्रयत्न करावे. विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ टिईटीग्रस्त शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून शिक्षकांनी एकजुटीनं आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय सचिव खिमेश बढिये यांनी केले.
यावेळी दिपक कोंबाडे, भिमराव शिंदेमेश्राम, मौदा तालुका संघटक श्री सेलोटे, ढोरे मॅडम, राजु भस्मे यांच्यासह विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाचे शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.