समाजातील शेवटच्या गरजू पर्यंत पोहचा
किशोर जोरगेवार
सामाजीक क्षेत्रात काम करत असतांना समाजातीक प्रत्येक दुर्बल घटकाला न्याय मिळाला पहिजे ही भुमीका असणे गरजेचे आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून आपल्या आता या दिशेने काम करायचे आहे. यासाठी आपण सज्ज व्हा असे सांगत समाजातील प्रत्येक गरजू पर्यंत पोहचून त्यांच्या हक्कासाठी लढा उभारा असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना केले. काल गुरुवारी यंग चांदा ब्रिगेड, दिव्यांग कौशल्य विकास संस्था तथा जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग बांधवांना तिन चाकी सायकल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित यंग चांदा ब्रिगेडच्या शाखा प्रमुखांना संबोधीत करतांना जोरगेवार बोलत होते. यावेळी पाच दिव्यांग बांधवांना तिन चाकी सायकलचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी जन विकास अपंग सेनेचे, जिल्हाध्यक्ष निलेश पाझारे, जिल्हा संघटक मुन्ना खोब्रागडे, दिपक दापके,नगरसेवक विशाल निंबाळकर, माजी नगरसेवक बलराम डोडानी, वंदना हातगावकर, कल्पना शिंदे यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, समाजातील प्रत्येक दुर्बल घटकांपर्यंत पोहचण्याचे काम यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून सूरु आहे. दिव्यांग हा सुध्दा याच समाजातील एक घटक आहे. मात्र त्यांच्या अणेक अडचणी आहे. त्याकडे शासण प्रशासण लक्ष देतांना दिसत नाही. परिणामी हा घटक मुख्य प्रवाहापासून दुरावत आहे. मात्र आता यापूढे यंग चांदा ब्रिगेड या दिव्यांग बांधवांच्या पाठीशी ठाम पणे उभी राहून त्यांच्या प्रत्येक अडचणींचे निराकरण करण्यासाठी संघर्ष करेल असी ग्वाही या प्रसंगी बोलतांना जोरगेवार यांनी दिली. यंग चांदा ब्रिगेड अत्यल्प कमी वेळात जिल्ह्यात मोठी समाजकी संस्था म्हणून समोर आली आहे. यंग चांदा ब्रिगेडकडून नागरिकांनाही मोठया आशा आहे. त्यामूळे आता यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी आणि सदस्यांचीही जबाबदारी वाढली आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून अणेक उपक्रम घेतल्या जात आहे. यात नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शहरातील पाणी पश्नावरही यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यामातून आंदोलने केल्या जात आहे. यातही काही प्रामणात आपल्याला यश आले आहे. मात्र एवढयावरच थांबून चालणार नाही. हा लढा आणखी तिव्र करावा लागणार आहे. असेही या प्रसंगी जोरगेवार यांनी सांगीतले तसेच समाजीक क्षेत्रात काम करतांना यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी समाजातील शेवटच्या गरजू पर्यंत पोहचावे व त्यांच्या न्यायक हक्कासाठी संघर्ष करावा असे आवाहण या प्रसंगी जोरगेवार यांनी कार्यकर्त्यांना केले. या प्रसंगी दिव्यांग बांधवांना किशोर जोरगेवार यांच्या हस्ते तिन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या सर्व महिला शाखा प्रमुखांची उपस्थिती होती.