यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून
टॅकरद्वारे शहरात पाणी पूरवठा
चंद्रपूर/प्रतिनिधी:
मानवनिर्मीत पाणी संकटा विरोधात यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार संघर्ष करत आहे. मात्र गाढ झोपेत असलेले प्रशासण जागतांना दिसत नाही. ही बाब लक्षात येताच आता यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून टॅकरने शहरात निःशूल्क पाणी पूरवठा केल्या जात आहे.
किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई जोरगेवार यांच्या हस्ते या टॅकरचे उद्घाटण करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार नगरसेवक विशाल निंबाळकर, वंदना हातगावकर, संतोषी चव्हाण, वच्छला बच्छाव, कल्पना शिंदे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ईरइ धरणात मुबलक पाणीसाठा असतांनाही केवळ आर्थिक समीकरनाचे जूळवा जुळव करण्यासाठी चंद्रपूर शहरात मानवनिर्मीत पाणी टंचाई निर्माण करण्यात आली आहे. शहरातील अनेक भागात पाच दिवसाआळ नळाद्वारे पाणी पूरवठा केल्या जात आहे. परिणामी शहरात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. या विरोधात यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी आपला संघर्ष कायम ठेवला आहे. त्यांनी पाणी प्रश्नावर यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक आंदोलने केली आहे.
यानंतर शहरातील काही प्रभागात अनियमीत पाणी पूरवठा सुरु करण्यात आला आहे. मात्र यावर जोरगेवार संतुष्ट नसून शहरात नियमीत पाणी पूरवठा करा या मागणीवर ते थाम आहे. दरम्यान चंद्रपूरकरांची तहान भागविण्यासाठी त्यांनी स्वताह पूढाकार घेतला असून यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून पाण्याच्या टॅकरद्वारे शहरात पाणी पूरवठा करण्याची मोहिम हाती घेतली आहे.
या मोहिमेत यंग चांदा ब्रिगेडचे कार्यकर्ते सक्रियरित्या सहभागी झाले असून शहरातील एकही नागरिक तहानलेला राहायला नको असे आवाहण जोरगेवारांनी कार्यकर्त्यांना केले आहे. सध्या दोन पाण्याच्या टॅकर नागरिकांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आल्या असून गरजेनूसार त्यात वाढ केली जाणार आहे. अतिषय पाणी संकट असलेल्या भागात या टॅकर पोहचत असून नागरिकांची तहान भागवत आहे.
या दोन टॅकरच्या माध्यमातून ही सेवा निःशुल्क सुरु आहे. जे काम प्रशासणाने करणे अपेक्षीत होते. ते कार्य किशोर जोरगेवार यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून करत असल्याने त्यांच्या कार्याचे कौतूक केल्या जात आहे. आमच्या माध्यमातून पाणी पूरवठा सूरु असला म्हणून प्रशासणाची जबाबदारी संपली असे त्यांनी गृहित धरु नये.
शासक म्हणून त्यांना त्यांची जवाबदारी पार पाडावीस लागेल असेही जोरगेवार यांनी प्रशासनाला ठणकावून सांगीतले आहे. तसेच पाण्याची गरज असल्यास नागरिकांनी किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहणही जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.