युवकावर ॲट्रॉसिटी अँक्ट गुन्हा दाखल
वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे :
वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महादेव नगर मधील तरुणीवर अत्याचार केल्याने वाडी परीसरात एकच खळबळ उडाली आहे.पोलीस सुत्राच्या प्राप्त माहितीनुसार आरोपी ट्रक चालक पवन नथ्युजी सार्वे वय ३२ राहणार महादेव नगर ,लाव्हा असे आहे.मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आरोपीने वारंवार शारीरीक संबंध प्रस्तापित केले. २०१८ च्या सप्टेंबर महिन्यात मुलगी गर्भवती झाली होती.
मुलीची आई मृत पावली आहे . वडीलांना गर्भवती असल्याचे लक्षात येताच तिला दवाखान्यात भरती केली तिथेच तिला मुलगी झाली . त्यानंतर त्या बाळाला नागपूर मधील अनाथालयात दाखल केले होते.अनाथालयाच्या सतर्कतेमुळे जन्म देणारी युवती नाबालीक असल्याचे लक्षात येताच वाडी पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
संबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली.चौकशी दरम्यान स्पष्ट झाले की हा बलात्काराचा प्रकार असून कुठेतरी काहीतरी गडबड आहे त्यामुळे चौकशी अंती आरोपीवर कलम ३७६,३५६(२) व ॲट्रॉसिटी अॅक्ट चा गुन्हा दाखल करण्यात आले. पुढील तपास एसीपी सिद्धार्थ शिंदे करीत आहे.