Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे १७, २०१९

माजी आमदार दादाराव केचे यांचे गावकऱ्यांसोबत श्रमदान

उमेश तिवारी/कारंजा (घाडगे):

कारंजा तालुक्यातील उमरी या गावी माजी आमदार दादाराव केचे यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह अचानक उपस्थित होत श्रमदान केले. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप मध्ये उमरी गावाने सहभाग घेतला असुन अनेक संस्था, वयोवृद्ध नागरीकांपासुन लहानगे उमरीला दुष्काळ मुक्त करण्यासाठी श्रमदान करीत आहेत. पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असल्याने प्रत्येक गावांनी आता चांगलीच कंबर कसली आहे.

परंतु ४७°सेल्सिअस येवढ्या वाढत्या तापमानात देखिल गावोगावी श्रमदानातून होत असलेली जलसंवर्धनाची कामे वाखाणण्याजोगी आहेत असे दादाराव केचे यांनी याप्रसंगी सांगत पुढच्या पिढीच्या सोईच्या दृष्टीने पाण्याचा थेंब अन थेंब जतन करणे अत्यावश्यक झाले असुन दुष्काळ मुक्त गावे झाल्यास उन्हातान्हात काम करणाऱ्या जलयोद्धांची नावे सदैव लक्षात ठेवली जातील आणि आर्वी विधानसभा क्षेत्र सदैव जलयोद्धांचे ऋणी राहील असे सांगितले.

तत्पूर्वी माजी आमदार दादाराव केचे यांच्या आगमनाने श्रमदात्यांनी प्रफुल्लित होत दुपटीने श्रमदान केले. दादाराव केचे यांच्या सोबत यावेळी मुकुंदराव बारंगे अध्यक्ष कारंजा तालुका भाजप, गौरी अग्रवाल, हरिभाऊ जसुतकर, शिरीष भांगे, धनराज गोरे, दिनेश ढोबाळे, किशोर भांगे, चक्रधर डोंगरे, तेजराव बननगरे, कृष्णा बननगरे, सचिन कामटकर, कमलेश ढोबाळे, आशिष चोपडे, अनिल वंजारी, हेमंत बन्नगरे,विलास गुरव, प्रशांत भक्ते, विक्की चोपडे, धिरज पठाडे, जितेंद्र देवासे, सुभाष चौधरी, योगेश कामटकर, वासुदेव डोंगरे, हिराताई डोंगरे, खेमलता डोंगरे, योगेश ढोबाळे, मनिषा मुंगभाते यांच्या सह उमरी परीसरातील तरूण, तरूणी, वयोवृद्ध नागरीकांची श्रमदानाला लक्षणीय उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.