Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०९, २०१९

लोकसभा निवडणूक 2019 साठी पहिल्या टप्प्यातले मतदान 11 एप्रिल 2019 ला

  • 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 91 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान
  • महाराष्ट्रातले 7 मतदारसंघ

नवी दिल्ली, 9 एप्रिल 2019
लोकसभा निवडणूक 2019 साठी पहिल्या टप्प्यातले मतदान 11 एप्रिल 2019 ला होणार आहे. लोकसभेच्या 543 जागांपैकी 91 जागांवर या दिवशी मतदान होणार आहे.

आंध्र प्रदेश (25), अरुणाचल प्रदेश (2), मेघालय (2), उत्तराखंड (5), मिझोराम (1), नागालॅण्ड (1), सिक्कीम (1), लक्षद्वीप (1), अंदमान निकोबार बेटे (1) आणि तेलंगणा (17) इथल्या सर्व लोकसभा मतदारसंघात 11 एप्रिलला मतदान होणार आहे.

महाराष्ट्रातल्या 48 पैकी वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या सात मतदारसंघात 11 एप्रिलला मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आसाममधल्या 5, बिहारमधल्या 4, छत्तीसगडमधल्या 1, जम्मू-काश्मीरमधल्या 2, मणिपूरमधल्या 1, ओदिशामधल्या 4, त्रिपुरामधल्या 1, उत्तर प्रदेशातल्या 8आणि पश्चिम बंगालमधल्या 2 जागांचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यापासून सातव्या टप्प्यापर्यंतचे मतदान 18 एप्रिल, 23 एप्रिल, 29 एप्रिल, 6 मे, 12 मे आणि 19 मे रोजी होणार आहे.17 व्या लोकसभेसाठी मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.