Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०९, २०१९

जेएसडब्ल्यू ग्रुपचा फर्निचर व्यवसायात प्रवेश


 भारतात फॉर्मा ब्रँड दाखल

फोर्माला भारतातील आघाडीच्या पाच ब्रॅण्डपैकी एक बनविण्याचे जेएसडब्ल्यूचे लक्ष

 मुंबईदि. एप्रिल २०१९: जेएसडब्ल्यू समूह हा सुमारे १३ बिलियन डॉलर मूल्याचा भारतातील आघाडीचा  उद्योग  समूहाने,  फॉर्मा  हा  फर्निचर  ब्रँड  दाखल  करीत,  भारतातील  वेगाने  वाढणाऱ्या  फर्निचर बाजारपेठेत अधिकृत प्रवेश केल्याचे आज जाहीर केले.  हा व्यावसायिक प्रवेश म्हणजे विविध ग्राहक केंद्रित 
व्यवसायात उतरण्याच्या जेएसडब्ल्यू समूहाच्या योजनेचा एक भाग आहे. फॉर्मा हा ब्रँड दाखल झाल्यामुळे , गेल्या पाच वर्षात सुमारे ११ % सीएजीआर नोंदविणाऱ्या, भारतातील फर्निचर बाजाराच्या प्रचंड वाढीच्या क्षमतेच्या संधीचा लाभ घेण्यासाठी, पायाभूत सुविधा क्षेत्रातील हा समूह सक्षम होईल. फॉर्मा हा जेएसडब्ल्यू लिविंग प्रा. लि.चा फर्निचर ब्रँड म्हणून दाखल झालाआहे. 

भारतीयांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या फर्निचर, सामग्री आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या सर्व मूल्य श्रुंखलेमध्ये कंपनीचे अस्तित्व राहील. मोठी संख्या असणाऱ्या वापरकर्त्यांसाठी चांगले डिझाईन देण्यासाठी दीर्घकालीन आणि टिकावूपणावर संपूर्ण भर दिला आहे. बाजाराच्या एका व्यापक संशोधनाच्या आधारे भारतीय ग्राहकांसाठी अनुकूल श्रेणी फोर्माने विकसित केल्या आहेत. 

यासंदर्भात बोलताना, जेएसडब्ल्यू लिविंगच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. तारिणी जिंदाल हांडा  यांनी सांगितले कि," आम्ही आता शिकत आहोत आणि खूप अंतर अजून पार करायचे आहे. नवीन उत्पादा आणि पर्या देऊन भारतीयांना मदत करण्याचा विश्वास घेऊन आम्ही एक छोटीसी सुरुवात केली आहे. अद्वितीय डिझाईन बनविण्यासाठी आमची टीम तसेच देशातील आणि परदेशातील डिझायनर्स घेऊन आम्ही काम करीत आहोत. फॉर्माच्या माध्यमातून आम्ही भारतातील समाजाच्या मोठ्या वर्गापर्यंत चांगले डिझाईन पोहचवू. 

जेएसडब्ल्यू लिविंगचे सीईओ बेदराज त्रिपाठी यांनी सांगितले कि,"डिझाईन उपलब्ध करतानाच, भारताच्या प्रत्येक भागात पोहचणे आणि अग्रस्थानी भारतीय वापरकर्त्यांना आणणे आवश्यक आहे. त्यामुळे आमचा स्पर्शहोणाऱ्या प्रत्येक भौगोलिक क्षेत्रात प्रवेश करण्यास फॉर्माटीमला बळ मिळेल. या व्यवसायात अन्य कोणापेक्षा अतिशय वेगाने आपला विस्तार करणे आमच्यासाठी फार महत्वाचे आहे."

भारतातील आघाडीच्या पहिल्या पाच फर्निचर ब्रॅण्डपैकी एक होण्याचे फोर्माचे ध्येय 


भारतातील फर्निचर बाजारपेठ ही सुमारे १९ बिलियन डॉलरची असून गेल्या पाच वर्षात सीएजीआर ११ % ने वाढला आहे. यामध्ये संघटित क्षेत्राचा वाटा संपूर्ण फर्निचर मार्केटच्या १६ % असून तो ५० प्रमुख कंपन्यांमध्ये विभागाला आहे. भारतातील आघाडीच्या पहिल्या पाच फर्निचर ब्रॅण्डपैकी एक होण्याचे फॉर्माचे ध्येय आहे. टिकाऊ सामग्री, अद्वितीय उत्पादन पोर्टफोलिओ, वापरकर्ता अनुभव आणि बाजार प्रवेश यावर लक्ष केंद्रित करून जेएसडब्ल्यू ग्रुपचा फॉर्मा ब्रँड भारतीय फर्निचर मार्केटमध्ये एक महत्त्वाचे स्थान निर्माण करणार आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.