Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल ०९, २०१९

बाळू धानोरकर नरेश पुगलियांच्या भेटीला;चर्चेत...

राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे
नागपूर/प्रतिनिधी:

ऐन प्रचार तोफा थंडावताच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार बाळू धानोरकर ह्यांनी कॉंग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले,लोकसभा निवडणूकसाठी चंद्रपूर जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार संपला. त्यानंतर लगेच चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी माजी खासदार नरेश पुगलिया यांची भेट घेतली यांच्या भेटीने संपूर्ण राजकीय समीकरण बदल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

                                                                       चंद्रपुरात कॉंग्रेसमध्ये पुगलिया आणि वडेट्टीवार असे दोन गट आहेत,ह्यातील पुगलिया गट हा धानोरकरांना तिकीट मिळाल्यामुळे नाराज झाला होता,माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे यांच्या तिकीट कापल्याने संपूर्ण तेली समाज नाराज झाला होता, तर पक्ष अध्यक्ष राहुल गांधी धानोरकर यांच्या प्रचाराला चंद्रपुरात आले असता नाराज नरेश पुगलिया ह्यांची त्यांच्या सभेला अनुपस्थिती होती,त्यामुळे पुगलिया हे वरिष्ठांवर नाराज असल्याचे चित्र निर्माण झाले होते.

निवडणुकीचा अर्धा कार्यकाळ आटोपला असतानाही धानोरकर हे पुगलीयांच्या भेटीला गले नाहीत,अशातच धानोरकर आणि पुगलिया यांच्यातला एक जुना फोटो सोशल मिडीयावर कॉंग्रेस समर्थकांनी व्हायरल केला होता, यावरून सोशल मीडियात फेसबुकवर चांगलाच वाद रंगू लागला होता, त्या फोटोत सीट मिळतात धानोरकर पुगलीया यांचेकडे गेले असा संदेश मतदारांमध्ये गेला. मात्र त्यानंतर हा फोटो जुना असल्याचा स्पष्ट झाले.

या भेटीदरम्यान धानोरकर-पुगलिया यांच्यात १ तास गुप्त चर्चा झाली, ह्यात नरेश पुगलिया यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न यावेळी धानोरकर यांनी केला असल्याचे बोलल्या जात आहे,मात्र धानोरकर आणि पुगलिया यांच्यात मतभेद नसल्याचे धानोरकर यांनी सांगितले.नरेश पुगलिया हे अनुभवी राजकारणी आहेत त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलो असल्याचे धानोरकरांनी सांगितले,पुगलिया यांची पक्षनिष्ठा बघता व नाराज गटातील मत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न धानोरकर यांचेकडून करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. 

धानोरकर-पुगलिया यांच्या भेटीमुळे बाळू धानोरकर यांना या भेटीचा फायदा होणार का ? कि पुगलिया यांचे नाराज कार्यकर्ते यात बंडखोरी करतील हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
पोल्ट्री फीड 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.