(राजु पिसाळ) सातारा-पुसेसावळी :
खटाव तालुक्यातील चोराडे गावातील अपंग असलेला युवक कुमार पिसाळ याने आपल्या उदरनिर्वाहासाठी स्वत: व्यवसाय करण्याचा निर्णय घेऊन आज तो या गावात रसवंतीगृह चालवुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित आहे, तसेच या रसवंतीगृहावर अंध व दिव्यांग व्यक्तीला एका रुपयात रसाचा एक ग्लास दिला जातो.
त्याच्या या जिद्दिचे कौतुक सर्व स्तरावरुन होत आहे. त्यामुळे घुंगरे खुळूखुळू वाजायला लागली असल्याचे चित्र दिसु लागले आहे.
सध्या फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हाचा चटका चांगला जाणवू लागल्यामुळे व्यावसायिकांनी सरस्वती गृहे सुरु केली असून गावागावांमध्ये घुंगरु खुळखळू वाजु लागली आहेत ,
तरी या रसवंतीगृहावर पुंदया ऊसाचा रस असल्यामुळे तिथे ग्राहकांची गर्दी दिसत आहे, त्यामुळे पुंदया ऊसाची मागणीत वाढ झालेली अाहे, तरी सकाळपासूनच ऊनाचा चटका चांगला वाढल्यामुळे थंड पिण्यासाठी ग्राहकांकडून ऊसाच्या रसाला पसंती दिली आहे, या परिसरातील शेतकर्यांना पुंदया उसाला गुंठ्याला सात ते आठ हजाराचा दर मिळत आहे.
यामुळे बरेच शेतकरी फक्त पुंदया ऊसाची लागण करित कारण शेतकर्यांच्या ऊसाला दराबाबतची हमी नसल्यामुळे या पुंदया ऊसाला उन्हाळयात चांगली असल्यामुळे या लागणी वाढलेल्या आहेत. त्यामुळे रसवंतीगृह व्यवसायिकांनासुद्धा पुंद्या ऊस उपलब्ध होत आहे .