नूतन पी एस आय पदी निवड झाल्याबद्दल जयश्री कांबळे चे अभिनंदन करताना मायणी येथील मान्यवर....
|
अनुसूचित जात प्रवर्गात महाराष्ट्रात चौदावी
मायणी :- ता.खटाव जि.सातारा(सतीश डोंगरे)
गरिबी आणि पैशाची कमतरता ही कारणे मनात जिद्द व चिकाटी असेल तर निरर्थक ठरतात हे अनफळे ता.खटाव येथील माजी सैनिक कै.आबासो कांबळे यांची कन्या जयश्री आबासो कांबळे हिने सिद्ध करून दाखवले
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सन २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या m.p.s.c परीक्षेत महिला गटात १७१ चे गुणांची आवश्यकता असताना १८५ मार्क मिळवून जयश्रीची पोलीस निरीक्षक पदी निवड तर झाली असून जयश्रीने अनुसूचित जाती गटामध्ये १४ वा क्रमांक पटकावत उत्तुंग यश संपादन केले आहे. देशाचे सैनिक म्हणून काम केलेल्या तिच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर जयश्रीची आई श्रीमती सविता कांबळे यांनी मुलगी जयश्री व मुले स्वप्नील व राहुल यांचे सक्षम संगोपन केले. गत पाच वर्षांपासून चिकाटीने अभ्यास करून उराशी ठेवलेले स्वप्न जयश्रीने साकार केले . तिच्या या यशाबद्दल मायणी येथील राजकीय ,सामाजिक ,सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी सन्मान केला.
कुटुंबातील सहयोगाने आज हे यश मला मिळाले आहे . त्यांच्या प्रेरनेणे आशीर्वादाने इथपर्यंत पोचले घरच्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बगून मन सुखावले जे स्वप्न उरी बाळगले होते ते आज सत्यात उतरले अशी भावनिक प्रतिक्रिया दिली
- जयश्री आबासो कांबळे, नूतन पोलीस उपनिरीक्षक
जयश्रीच्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी अनपेक्षित माझ्यावर पडली परंतु आजवर घेतलेल्या अपार कष्टाचे चीज झाले असून जयश्री पोलीस अधिकारी झाली ऐकून डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.
सविता कांबळे, जयश्रीची आई.