दोन जागीच ठार तिघे गंभीर जखमी
मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील घटना
रमेश माहूरवार/मूल-
चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथे भिषण अपघातात जागीच दोघांचा मृत्यु झाला तर तिघे गंभीर जखमी आहेत. मृतकाचे नाव समिर मेश्राम वय 23, प्रदिप गिरटकर वय 28 रा.जुनासुर्ला येथिल आहे. तर जखमी लहुजी मेश्राम वय 60रा.जुनासुर्ला , गणेश आंबटकर वय 38 रा जुनासुर्ला, प्रभाकर नैताम वय 60 रा गडिसुर्ला येथिल रहिवासी आहेत.
समिर मेश्राम व प्रदिप गिरटकर हे जुनासुर्लाच्या बसस्टाप वरील चाय टपरीवर बसले होते. चामोर्शी वरून मेडिसीन घेउन येणारा गाडी नं. एमएच 34 बी जी 0750 क्रमांकाचा मेट्याडोर चाय टपरीसह बसलेल्यांना उडविले. चालक व त्याचे सोबती हे दारू पिउन असल्याने व चालकाने गाडी चालवायला सोबत असलेल्या मजुराला दिल्याने हा मोठा अपघात झाला असल्याचे सांगितले जात आहे.
आज जुनासुर्ला येथिल आठवडी बाजार असल्याने व जिल्हा परीषद शाळेची आज सकाळची शाळा असल्याने मोठा अपघात टळला असल्याचे बोलल्या जात आहे.