सोलापूर - रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या अॅड. वैशाली चांदणे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण आज शनिवारी रुग्ण हक्क परिषदेच्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमा निमित्त सोलापुर दौर्यावर आले होते. इंद्रप्रस्थ सभागृहामध्ये रुग्ण हक्क परिषदेची बैठक पार पडली, सोलापुर येथील विजयराव कांबळे, पंडीतराव जानकर, अमोल धेंडे, संगीता कांबळे यांनी बैठकीची व्यवस्था व नियोजन केले.
दुपारी बारा वाजता सोलापुर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद पार पडली, फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा मंजूर करावा, त्यातून डॉक्टर वगळावेत ही आग्रही मागणी अॅड. वैशाली चांदणे आणि उमेश चव्हाण यांनी केली, सोलापुरमध्ये पंचतारांकित अद्ययावत हॉस्पिटल उभारणी आणि रुग्ण हक्क चळवळ आंदोलनात्मक मार्गाने जोर धरेल असे ते म्हणाले, सोलापुर दौर्यात राज्य संघटक नितिन शिंदे, सोलापुर समन्वयक डॉ. ख्वाजालाल ढोबळे यांनी महत्वपुर्ण भूमिका बजावली.
शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पदनियुक्त्या करुन कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये अमोल धेंडे, संदीप सुरवसे, इम्रान सय्यद, अमोल कोळेकर, अजिज सय्यद, प्रा. गणेश लेंगरे, अस्लम शेख सेडमवाले, योगेश कानडे आदि प्रमुख पदाधिकार्यांचा समावेश आहे.
रुग्ण हक्क परिषदेच्या दिवसभरातील कार्यक्रमात तरुणाईची संख्या लक्षणीय दिसून येत होती.