Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोलापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सोलापूर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, डिसेंबर ०४, २०२२

जुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश

जुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न; महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना हे आदेश

जुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न


सोलापूर (solapur) जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींने एकाच मुलाशी विवाह केला. एकाच मुलासोबत सख्ख्या बहिणींच्या या अगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झाला. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. Wedding photos and videos viral

अकलूज पोलीस स्टेशनचे पो. नि. अरुण सुगावकर यांनी याबाबत माहिती दिली आहे की, सदर प्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी तक्रार दाखल केली आहे. नवरदेवाच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल झाला आहे. त्यामुळे आता या नवरदेवावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

जर स्वखुशीने दोन्ही पत्नी राहत असतील तर तो गुन्हा ठरत नाही असं मत ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान या प्रकरणात आता महिला आयोगाने सुद्धा उडी घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे.तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा.@SpSolapurRural


अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. काही वर्षापूर्वी रिंकी आणि पिंकी यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर दोघीही बहीणी आई सोबत राहत होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी रिंकी,पिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्या. यावेळी अतुल या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने तीघींनाही रुग्णालयात दाखल केले. यावेळी अतुल याने त्या तिघींचीही सेवा केली. त्यामुळे तिघींनाही अतुल विषयी आपुलकी निर्माण झाली. यातूनच जुळ्या बहीणीमधील एकीचे अतुलवर प्रेम जडले. परंतु, या दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या वेगळं होवुन राहु शकत नव्हत्या. त्यामुळे आईच्या आणि अतुल याच्या कुटुंबीयांच्या संमतीने दोघींनीही अतुल याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांच्या समतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला. Wedding photos and videos viral


इंजिनिअर पदावर कार्यरत असणाऱ्या रिंकी आणि पिंकी (Rinki & Pinki) जुळ्या बहिणी आहेत. या दोघींचं शिक्षण एकत्रित झालं. त्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला देखील लागल्या. लहानपणापासूनच या दोघींना एकमेकींसोबत वाढल्या. दोघींनाही एकमेकींची एवढी सवय झाली की त्यांनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करून त्याच्यासोबत सप्तपदी घेतली. Rinki Pinki two twin sisters married with one boy


रविवार, सप्टेंबर १९, २०२१

महानगर पालिकेत 'बसपा'चा महापौर आरूढ होणार

महानगर पालिकेत 'बसपा'चा महापौर आरूढ होणार

सोलापूर महानगर पालिकेत 'बसपा'चा महापौर आरूढ होणार
बसपा प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांचा दावा




मुंबई, १८ सप्टेंबर -  सर्वसमावेशक,सर्वजन हितकारक विकासासाठी सोलापूर महानगर पालिकेत आगामी महापौर हा बहुजन समाज पार्टीचाच आरूढ होईल.फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारधारेने पावन आणि पुरोगामी झालेल्या महाराष्ट्राला जातीचे नाही, तर 'नीती'चे राज्य बनवण्याचे काम केवळ बसपाच करू शकते. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत यामुळे यंदा बसपाचे ४० नगरसेवक निवडून येती, असा दावा बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी आज,शनिवारी केला. सोलापूर येथे आयोजित 'संवाद यात्रे'च्या कार्यक्रमातून त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. महाविकास आघाडीच्या काळात होणाऱ्या भोंगळ कारभारावरही त्यांनी टिकास्त्र सोडले.

सोलापूर महानगर पालिकेत बसपाचे यापूर्वी ४ नगरसेवक निवडून आले होते.पंरतु,यावेळी उत्तम संघटन कौशल्य असलेले कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या जोरावर महापालिकेत बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. वॉर्डनिहाय संघटनात्मक रचना कार्यान्वित करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिले. राज्यात इतर मागासवर्गीय बांधवांचे हक्काचे राजकीय आरक्षण असो अथवा अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीच्या बांधवांना देण्यात येणारे पदोन्नती आरक्षणाचा प्रश्न असो.महाविकास आघाडी सर्वच पातळीवर फोल ठरली आहे.जनतेचा राज्य सरकार विरोधात असलेला रोष संवाद यात्रेतून दिसून येत आहे.

अशात सर्वजनांसाठी बसपा एकमेव पर्याय आहे.सर्वांनी बहन मायावतीजींच्या नेतृत्वात बसपाच्या झेंड्याखाली एकत्रित आले, तर सर्व प्रश्न सुटतील,असा दावा देखील अँड.ताजने यांनी केला. आता पक्षाची ताकद सत्ताधार्यांना दाखवण्याची वेळ आली आहे. आगामी निवडणुकांमधून ती ताकद सत्ताधार्यांना दिसेलच.पंरतु, समाज बांधवांच्या न्याय हक्काचा लढा बसपा लढणार आहे. ओबीसी, एससी, एसटीच्या आरक्षणाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली तरी बसपा मागे हटणार नाही, असा इशारा यावेळी अँड.ताजने यांनी दिला.

सोलापुर महानगर पालिकेअंतर्गत 'सर्वजन सुखाय,सर्वजन हिताय' या उद्दिष्ट प्राप्तीसाठी बसपा उत्तम पर्याय आहे. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न असो, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो अथवा शोषित, पीडित, उपेक्षितांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असो, बसपा सत्तेत आली तर सर्वसमावेशक विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील, असे देखील अँड.संदीप ताजने म्हणाले. बसपाला त्यामुळे राज्यभरात जातीचे नाही, तर 'नीती'चे लोक तयार करायचे आहे. आणि याच चांगल्या नितीच्या लोकांमुळे समाज परिर्वतन होण्याच्या दिशेने पाऊल टाकले जाईल, असे अँड.ताजने यावेळी म्हणाले.

कार्यक्रमात प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब यांच्यासह प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे, जिल्हा प्रभारी अशोक अगवणे, बलभीम कांबळे, जिल्हा अध्यक्ष मिलिंद बनसोड, हुलगेश चलवादी, काळूराम चौधरी ,शहर अध्यक्ष देवा भाई उघडे, जिल्हा उपाध्यक्ष अँड.प्रेमनाथ सोनावणे, कोषाध्यक्ष विलास शेरखाने, सचिव योगेश गायकवाड, शहर सचिव मिझा शेख, प्रविण कांबळे तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

'जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागेदारी'-रैना
मा.कांशीराम साहेब यांनी 'जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी भागेदारी'ची घोषणा दिली होती.जातीनिहाय लोकसंख्येच्या आधारे प्रतिनिधित्व देण्याची बसपाची मागणी अगोदरपासूनच आहे. मा.बहन मायावती जी यांच्या नेतृत्वात याच दिशेने पार्टी कार्यरत आहे, असे प्रदेश प्रभारी प्रमोद रैना म्हणाले. आगामी निवडणुकांमध्ये तरूण, महिलांना योग्य प्रतिनिधित्व दिले जाईल. उत्तर प्रदेशात पाचव्यांदा बहन मायावती जींच्या नेतृत्वात बसपाची सत्ता येणार असल्याचा दावा रैना यांनी केला.

 

 
 
 
  


बुधवार, जुलै २८, २०२१

ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा | Ganpatrao Deshmukh

ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या प्रकृतीत सुधारणा | Ganpatrao Deshmukh



अफवांवर विश्वास ठेवू नका : आमदार भाई जयंत पाटील यांचे आवाहन

सोलापूर (२८ जुलै) : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी दिली.

सोलापूर येथील अश्विनी या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. आज भाई जयंत पाटील, सुप्रीयाताई पाटील,प्रा.एस.व्ही.जाधव, कार्यालयीन चिटणीस ॲड राजेंद्र कोरडे यांनी भाई गणपतराव देशमुख यांची भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली. संबंधित डाॅक्टर आणि परिवारातील सदस्यांची चर्चा केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली असून भाई गणपतराव देशमुख यांच्या तब्येतीशी संबंधित कालपासून येणाऱ्या उलटसुलट बातम्यांवर शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि सांगोल्यातील जनतेने विश्वास ठेवू नये,असे आवाहनही भाई जयंत पाटील यांनी केले आहे.

भाई जयंत पाटील यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, जेष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांच्यावर हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार सुरू असून, ते उपचाराला उत्तम प्रतिसाद देत आहेत. त्यांची ऑक्सिजन लेव्हल आणि बीपी नॉर्मल असून, ते आवश्यक लिक्वीड डाएट घेत आहेत. शारिरीक हालचाल करीत आहेत. भाई गणपतराव देशमुख हे लवकरच पूर्णपणे बरे होऊन परततील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

भाई गणपतराव देशमुखांनी वयाची ९६ वर्षे पूर्ण केली आहेत. या वयातही ते आतापर्यंत मतदारसंघात फिरत होते. जनसामान्यांचे प्रश्‍न तडीस लावून नेत होते. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पित्ताशयातील खड्यांवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आहे.

आमदार गणपतराव देशमुख हे सलग ५४ वर्षे सांगोला विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद कऱण्यात आली आहे.

रोजगार हमी मंत्री असताना भाई गणपतराव देशमुख यांनी दुष्काळी सांगोला तालुक्याला डाळिंबासारख्या पिकाची लागवड करण्यास शेतकर्‍यांना प्रोत्साहन दिले. त्यांच्या प्रयत्नामुळेच आज सांगोल्याची डाळिंब उत्पादनात देशात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सत्वशील, चारित्र्यसंपन्न, निष्कलंक अशी त्यांची आजही राज्यभरात ओळख आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या वाटचालीत त्यांचा मोलाटा वाटा आहे. देशातील महिलांसाठीची पहिली सुतगिरणी देखील त्यांनीच सुरु केली. पाणी, रोजगार आणि शेती या क्षेत्राशी त्यांचा मोठा व्यासंग आहे.


बुधवार, मार्च ३१, २०२१

मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी समाधान औताडे यांना उमेदवारी

मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी समाधान औताडे यांना उमेदवारी

 मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी समाधान औताडे यांना उमेदवारी

 

पंढरपूर येथील मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून समाधान औताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाच्या केंद्रीय सांसदीय मंडळाने ही उमेदवारी जाहीर केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

श्री.समाधान औताडे हे गेल्या पाच वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेतले असून बांधकाम व्यवसायिक आहेत. तसेच ते साखर निर्मिती उद्योगात कार्यरत आहेत. सोलापूर येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालकपद ते भूषवित असून सोलापूर जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून श्री. औताडे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंगळवेढा तालुक्यात त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आरोग्यवैद्यकीय तसेच रोजगार शिबिरांचे आयोजन केले आहे. लॉकडाऊन काळात श्री. औताडे यांनी विविध माध्यमातून गरजू समाजघटकांना सहाय्य केले आहे. तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठीही श्री. औताडे विविध उपक्रमांचे आयोजन सातत्याने करीत असतात.

रविवार, मार्च १०, २०१९

सोलापुरातील तरुणाई रुग्ण हक्क परिषेत सामील

सोलापुरातील तरुणाई रुग्ण हक्क परिषेत सामील




सोलापूर  - रुग्ण हक्क परिषदेच्या नेत्या अॅड. वैशाली चांदणे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण आज शनिवारी रुग्ण हक्क परिषदेच्या विविध उपक्रम आणि कार्यक्रमा निमित्त सोलापुर दौर्यावर आले होते. इंद्रप्रस्थ सभागृहामध्ये रुग्ण हक्क परिषदेची बैठक पार पडली, सोलापुर येथील विजयराव कांबळे, पंडीतराव जानकर, अमोल धेंडे, संगीता कांबळे यांनी बैठकीची व्यवस्था व नियोजन केले.

दुपारी बारा वाजता सोलापुर श्रमिक पत्रकार संघात पत्रकार परिषद पार पडली, फौजदारी संहितेचा रुग्ण हक्क संरक्षण कायदा मंजूर करावा, त्यातून डॉक्टर वगळावेत ही आग्रही मागणी अॅड. वैशाली चांदणे आणि उमेश चव्हाण यांनी केली, सोलापुरमध्ये पंचतारांकित अद्ययावत हॉस्पिटल उभारणी आणि रुग्ण हक्क चळवळ आंदोलनात्मक मार्गाने जोर धरेल असे ते म्हणाले, सोलापुर दौर्यात राज्य संघटक नितिन शिंदे, सोलापुर समन्वयक डॉ. ख्वाजालाल ढोबळे यांनी महत्वपुर्ण भूमिका बजावली.

शासकीय विश्रामगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पदनियुक्त्या करुन कार्यकारिणीची घोषणा केली. यामध्ये अमोल धेंडे, संदीप सुरवसे, इम्रान सय्यद, अमोल कोळेकर, अजिज सय्यद, प्रा. गणेश लेंगरे, अस्लम शेख सेडमवाले, योगेश कानडे आदि प्रमुख पदाधिकार्यांचा समावेश आहे.

रुग्ण हक्क परिषदेच्या दिवसभरातील कार्यक्रमात तरुणाईची संख्या लक्षणीय दिसून येत होती.