जुळ्या बहिणींनी केला एकाच मुलाशी लग्न
अकलूज पोलीस स्टेशनचे पो. नि. अरुण सुगावकर यांनी याबाबत माहिती दिली आहे की, सदर प्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी तक्रार दाखल केली आहे. नवरदेवाच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा (NCR) दाखल झाला आहे. त्यामुळे आता या नवरदेवावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
जर स्वखुशीने दोन्ही पत्नी राहत असतील तर तो गुन्हा ठरत नाही असं मत ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान या प्रकरणात आता महिला आयोगाने सुद्धा उडी घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे.तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा.@SpSolapurRural
अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. काही वर्षापूर्वी रिंकी आणि पिंकी यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर दोघीही बहीणी आई सोबत राहत होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी रिंकी,पिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्या. यावेळी अतुल या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने तीघींनाही रुग्णालयात दाखल केले. यावेळी अतुल याने त्या तिघींचीही सेवा केली. त्यामुळे तिघींनाही अतुल विषयी आपुलकी निर्माण झाली. यातूनच जुळ्या बहीणीमधील एकीचे अतुलवर प्रेम जडले. परंतु, या दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या वेगळं होवुन राहु शकत नव्हत्या. त्यामुळे आईच्या आणि अतुल याच्या कुटुंबीयांच्या संमतीने दोघींनीही अतुल याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांच्या समतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला. Wedding photos and videos viral
इंजिनिअर पदावर कार्यरत असणाऱ्या रिंकी आणि पिंकी (Rinki & Pinki) जुळ्या बहिणी आहेत. या दोघींचं शिक्षण एकत्रित झालं. त्यानंतर एकाच आयटी कंपनीत नोकरीला देखील लागल्या. लहानपणापासूनच या दोघींना एकमेकींसोबत वाढल्या. दोघींनाही एकमेकींची एवढी सवय झाली की त्यांनी एकाच वरास जीवनसाथी म्हणून निवड करून त्याच्यासोबत सप्तपदी घेतली. Rinki Pinki two twin sisters married with one boy