चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यात बामणी आणि सिंदेदेवाही तालुक्यातील मिनझरी येथे सोन्याच्या खाणी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर या भागातील जमिनींना मोठे भाव आले आहे. बल्लारपूर- गोंडपिंपरी मार्गावर असलेल्या गावात देखील आता शेतजमिनीचे भाव दुप्पट झाले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याच्या आणि तांब्याच्या खाणी आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर लगेचच जमिनींचे खरेदी- विक्री व्यवहार करणारी बिल्डर लॉबी सक्रिय झाली आहे. सोन्याच्या खाणीच्या बातम्या प्रकाशित होतात बिल्डर लॉबी आणि भूखंड माफीयांनी देखील आपल्या जमिनीला सोन्यासारखे भाव आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू केले आहेत. एरवी या भागामध्ये 300 ते 400 रुपये sqare प्रतिफूट असे दर या जमिनीचे होते. मात्र, सध्या 600 ते 800 रुपये sqare प्रतिफूट असे जमिनीचे दर सांगितले जात आहेत.
---------
#GoldMine #IndiaGoldMine #RealGoldMine
Gold-silver prices
#GoldMine #IndiaGoldMine #RealGoldMine
Gold-silver prices
- भारतात सोन्याच्या ज्या खाणी आहेत त्यापैकी सर्वात मोठी खाण ही कर्नाटक राज्यातील कोलार ही खाण आहे.
Big gold mine found India। भारतात सापडली सोन्याची मोठी खाण, कुठे आहे ही खाण? लगेच जाणून घ्या