बाबूपेठ येथे पाणपोईचे उद्घाटन
चंद्रपूर/प्रतिनिधी :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या तत्वाप्रमाणे स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हे अधिकार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनतेनी सामाजिक सेवा करून समाजकारणात पुढे आले पाहिजे व त्यांचे विचार सर्वसामान्यांन पर्यंत पोहचविण्याची जबाबदारी समाजावर आहे. या पानपोईच्या माध्यमातून तहान लेल्यांची तहान भागवण्याचे पुण्य घडणार आहे असे वक्तव्य किशोर जोरगेवार यांनी याप्रसंगी बोलाताना केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंती निमित्य बाबूपेठ येथे संजय मेश्राम यांनी सुरु केल्या पाणपोईचे उद्घाटन यंग चांदा ब्रिगेड चे संस्थापक लोकनेते किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर पाणपोईचे उद्घाटन पार पडले.
जल हि जीवन है. या ओवी प्रमाणे नागरिकांनी पाण्याची बचत करून प्रत्येक जनतेपर्यंत पिण्याचे पाणी पोहचवावे, पाण्याविणा कोणाचा जीव जाऊ नये म्हणून आपण फक्त बाबूपेठ येथेच पाणपोई चालू न करता संपूर्ण शहरात पाणपोई चालू करून जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे असेही बोलत जोरगेवार यांनी या सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी शशिकांत मेश्राम, कुणाल चन्ने, बुद्धकुमार अलोणे, संतोष रायपुरे, दीपक उंदिरवाडे, दिलीप मेश्राम, करूना रायपुरे, प्रीती अलोणे, कुणाल मेश्राम, मंगेश टीपले, नम्रता रायपुरे, इरफान शेख, कलाकार मल्लारप, हर्षद कानमपल्लीवार, अभिलाष कुंभारे यांच्यासह वार्डातील नागरिकांची उपस्थिती होती. चंद्रपुरचे तापमान हे देशात पहिल्या क्रमांकाचे आहे.
अती उष्ण जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची असून तापमान अति उष्ण असल्याने शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. म्हणून नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य बाबूपेठ येथे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.