जयश्रीराम च्या जयघोषणांनी दुमदुमली वाडी नगरी
वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे
येथील श्रीराम जन्मोत्सव समितीतर्फे मागील ३६ वर्षांपासून सुरु असलेली प्रभु श्रीरामचंद्र जन्मोत्सव निमित्त शोभायात्रा वाडी नाका नंबर १० येथील हनुमान मंदिरातून शनिवार १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता काढण्यात आली . संपूर्ण वाडी नगरी जय श्रीरामाच्या जय घोषणांनी दुमदुमून निघाली होती .
शोभायात्रा सुरू करण्यापूर्वी रथात विराजमान प्रभू श्रीराम,सीता,लक्ष्मण,व हनुमान यांची वेशभूषा केलेल्या सजीव पात्राचे पूजन भागवताचार्य देवी वैभवश्री आलेकर यांच्या हस्ते करण्यात आले .शोभायात्रेला आ . समीर मेघे,माजी मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली .
यावेळी नगराध्यक्ष प्रेम झाडे ,उपनगराध्यश राजेश थोराने,सामाजिक कार्यकर्ते सतीश जिंदल,नगरसेवक राजेश जयस्वाल,माजी उपनगराध्यक्ष नरेश चरडे, बांधकाम सभापती हर्षल काकडे, सभापती शालिनी रागीट, सभापती कल्पना सगदेव, शिक्षण सभापती मीरा परिहार, पाणी पुरवठा सभापती नीता कुणावार,नगरसेवक श्याम मंडपे,शैलेश थोराने,अश्विन बैस, केशव बांदरे , कमल कनोजे ,कैलास मंथापुरवार,दिनेश कोचे ,राकेश मिश्रा,सरिता यादव,मानसिंग ठाकूर, गोविंदराव रोडे ,सुनील तिवारी,पुरुषोत्तम रागीट,सुनील सिंग,नाना कोरपे,प्रकाश कोकाटे, दिलीप चौधरी,सतीश कौशीक, नानासाहेब आखरे, अॅड .श्रीराम बाटवे, दिपक दुधाने,संतोष केचे,प्रशांत कोरपे,गणपत रागीट,मोहन पाठक,राजेश जिरापूरे,अभय कुणावार,मुकूंद रंगदळे, विश्वनाथ मुदलीयार,आनंदबाबू कदम ,माणीक गोमकार, रुपेश झाडे , संतोष केचे , प्रा .मधू माणके पाटील, विजय मिश्रा , अखिल पोहणकर , कपील भलमे , योगेश देशपांडे , लोकपाल चापले प्रामुख्याने उपस्थित होते .
राष्ट्रीय महामार्गावरून निघालेल्या शोभायात्रेतील चित्ररथात गणपती दर्शन,भगवान शिवजी की बारात,सुवर्ण मृग दर्शन,वराह द्वारा हिरण्यकवच वध,वीरभद्र शिवजीअवतार,राधाकृष्ण अवतार,माता सरस्वती दर्शन,पंचमुखी हनुमान दर्शन,राम-सीता रथ,माताजी द्वारा असुर वध,हिरण्य कश्यप वध आदीचा समावेश होता.मुख्य महामार्गावर रोषणाई व भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या .कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता वाडीचे ठाणेदार राजेन्द्र पाठक यांच्या मार्गदर्शनात वाडी पोलीस स्टेशनतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.स्वामी विवेकानंद मंचच्या कार्यकर्त्यांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.शोभायात्रा बघण्यासाठी आजूबाजूच्या गांवातील रामभत्कांनी गर्दी केली होती.तसेच रस्त्याच्या बाजूला विविध राजकीय सामाजिक,शैक्षणिक संस्था संघटनांनी शरबत,अल्पोहर व प्रसादाची व्यवस्था केली होती.यावेळी संपूर्ण परिसर जय श्रीराम या गगनभेदी घोषणा व ढोल ताशे व डिजेवर वाजणाऱ्या धार्मिक गीतांनी दुमदुमून गेला होता. शोभायात्रेचा समारोप रात्री १२ वाजता गजानन सोसायटी मधील श्री राममंदीर व श्री संत गजानन महाराज मंदीरात करण्यात आला .