Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १५, २०१९

वाडीत श्रीराम जन्मोत्सव साजरा

वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:

येथील श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे गजानन सोसायटीतील श्री संत गजानन महाराज मंदीरात रविवार १३ एप्रिल रोजी सकाळी ६ ते दुपारी २ वाजता पर्यत श्रीराम जन्मोत्सव समीती तर्फे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला . या निमित्ताने होमहवन पुजा करण्यात आली . दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव मध्ये सहा महीन्याचा कार्तीक शर्मा यांने बाल रामाची भुमीका पार पाडली . 

यावेळी चारूशीला बनसोड यांनी नऊ दिवस श्रीराम जन्माच्या कथेचे अखंड रामायण पठन तसेच रामरक्षा स्तोत्र , मारोती स्तोत्राचे पठन केले . श्रीराम जयराम जय जय राम या तारक मंत्राचा जप करण्यात आला . महीलांनी दशरथ राजा यांच्या पूर्वजन्माची तसेच रामजन्माच्या कथेचे वाचन केले .नऊ दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात काकडा ,आरती, जसजागरण , सुंदर कांड आदी कार्यक्रम घेण्यात आले .कन्याभोजन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . 

यावेळी नगराध्यक्ष प्रेम झाडे , सतीश जिंदल , राजेश जयस्वाल , पुरुषोत्तम रागीट,मानसिंग ठाकूर, सुनील तिवारी, सुनील सिंग , नानासाहेब आखरे, दिपक दुधाने ,सतीश कौशीक, अॅड . श्रीराम बाटवे, लोकपाल चापले, आशीष भट्टलवार, पार्थ भट्टलवार , अरुण कराळे ,प्रशांत कोरपे ,गणपत रागीट , मोहन पाठक , मुकूंद रंगदळे, विश्वनाथ मुदलीयार , निळकंठ रासेकर , नवरंग कश्यप , गोविंद तिवारी, योगेश देशपांडे ,माणीक गोमकार , निवृत्ती पवार , कैलाशपती शर्मा, तेजराव निघोट , भरत मिश्रा आदीसह शेकडो महीला व पुरुष उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.