विविध कार्यक्रमासह भव्य रॅलीचे आयोजन
वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२८ वी जयंती वाडी शहरात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ . आंबेडकर नगर मधील त्रिशरण चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती तर्फे पंचशिल ध्वज फडकाविण्यात येऊन सामहीक बुद्धवंदना घेण्यात आली.याप्रसंगी नगराध्यक्ष प्रेम झाडे ,राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे, दिनेश बनसोड, राजेश थोराने,प्रकाश कोकाटे,दुर्योधन ढोणे, नरेश चरडे, दिनेश कोचे,आशिष नंदागवळी,राकेश मिश्रा,प्रमोद भोवरे,राजेश जंगले,रुपेश झाडे,नितेश जंगले,अश्विन बैस,योगेश चरडे,किशोर नागपूरकर , प्रा .मधु मानके,संजय अनासने,राजू शेळके,गौतम तिरपूडे प्रामुख्याने उपस्थित होते.
दुपारी संपूर्ण वाडी नगरीत भव्य रॅली काढण्यात येऊन संध्याकाळी सामुहीक बुद्धवंदना व भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन नगराध्यक्ष प्रेम झाडे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे अध्यक्ष श्याम मंडपे, डॉ .राजाभाऊ टांकसाळे ,राजेश जयस्वाल,बांधकाम सभापती हर्षल काकडे,नरेश चरडे, दिनेश कोचे ,वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र पाठक,शैलेश थोराने, रूपेश झाडे ,विजय मिश्रा प्रामुख्याने उपस्थित होते,धम्मकिर्ती नगर स्थित बुद्धविहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालर्यापण करून १२८ किलोचा केक नरेन्द्र मेंढे यांच्या हस्ते कापण्यात आला.यावेळी भदन्त महापंत महाथैरो, विजय मेंढे ,बंडु रामटेके,ज्ञानेश्वर गोलाईत,राजेन्द्र कांबळे, राजेन्द्र पाटील,मनोहर गजभिये,अशोक वासेकर, जया मेंढे,शकूतंला वानखेडे,पुष्पा गवळी,कला खंडाळे,राकेश चिल्लुरे,मनोज मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.टेकडी वाडी बौद्धविहारातुन राहुल क्रिडा मंडळ आणि धम्मकिर्ती नगर युवामंच तफै धम्म किर्ती विहारातुन भव्य रॅली काढण्यात आली .लाव्हा येथे उपसभापती सुजित नितनवरे,सरपंच ज्योत्सना नितनवरे,उपसरपंच महेश चोखांद्रे,तसेच समस्त सदस्य यांच्या उपस्थितीत प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली .
कोहळे लेआऊटमध्ये भव्य महाप्रसाद वितरीत करून रॅली काढण्यात आली यात जेष्ठ नागरीक मंडळ,गौतमी महीला मंडळ,भिमाई महीला मंडळ,अस्मीता मंच,समता सैनीक दल सहभागी होत्या, रॅली दरम्यान वाडी दुकानदार संघटना, दत्तवाडी दुकानदार संघटना,युवक कॉग्रेस,भाजपा युवा मोर्चा,युवासेना,एकता टेम्पो युनीयन महासंघ आदी विविध सामाजीक राजकीय संघटनेनी पाणी,चहा,कॉफी,शरबत,चना,नास्ता व महाप्रसादाचे वितरण केले.रॅली मध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता वाडी पोलीस स्टेशनतर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
तसेच वाडी पोलीस स्टेशन येथे डॉ .बाबासाहेब यांच्या प्रतीमेला माल्यार्पण करुन केक कापन्यात आला.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेन्द्र पाठक सह कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होता.स्थानिक जिल्हा परिषद,खाजगी शाळेत तेथील मुख्याध्यापक यांच्या हस्ते डॉ . बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले