डी.बी. पथक पोलीसांची कामगिरी
वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:
वाडी पोलीस स्टेशन मधील डी.बी. पथकांनी शनिवार १३ एप्रिल रोजी रात्री ८ .३० च्या दरम्यान २१ हजार रूपयाची दारु जप्त केली . तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमोल लाकडे व त्यांच्या सहकारी सह शासकीय वाहन क्रमांक एम.एच .३१ डी. झेड १०३ ने गस्त करीत असतांना गुप्त बातमीदाराच्या आधारे मिळालेल्या माहितीवरून आठवा मैल येथील मोहाडे लेआउट ,रामजी आंबेडकर नगर मधील आरोपी सुजित रंजीत रामटेके (वय २०) हा आपल्या घराजवळ दारू विक्री करीत असल्याचे पोलीसांच्या लक्षात आल्याने त्याच्याजवळ इन्पेरियल ब्लु नावाची इंग्रजी व्हिस्की १८० एमएलच्या ०८ सिलबंद बॉटल १४० रु प्रमाणे एकूण ११२० रुपये, व संत्रा नं. १ ची १८० एमएलची देशी दारू ५० सिलबंद बॉटल ५२ रुपये प्रमाणे एकूण २६०० रुपये असे एकूण ३७२० रुपयाचा माल पोलीसांनी जप्त केला .
आरोपी सुजित रंजित रामटेके विरुद्ध पोलीस स्टेशन वाडी अप. क्र. १६४ / १९ कलम ६५ (ई) म.दा.का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच दुसरीकडे पोलिसांना गुप्त बातमीदाराच्या मिळालेल्या माहितीनुसार दोन पंच व स्टाफ सह डॉ .आंबेडकर नगर रमाबाई चौक,प्रजापती फुटवेअरच्या समोरील नाल्याच्या आत मध्ये कोरड्या भागात सायंकाळी ८ वाजून ५० मिनिटच्या दरम्यान पोलीस पोहचवून सदर ठिकाणी पाहणी केली असता गटराच्या नाल्याच्या आत मध्ये कोरड्या भागात देशी दारूचे ७ पेट्या दिसून आल्या. प्रत्येक पेट्यांमध्ये ४८ संत्रा नं. १ ची १८० एमएलची देशी दारूच्या बॉटला एकूण ७ पेटया मध्ये ३३६ बॉटल प्रत्येकी ५२ रुपये प्रमाणे एकूण १७,४७२ रुपया चा मुद्येमाल पंचाचे व स्टाफचे समक्ष मिळून आल्याने पोलीसांनी माल जप्त केला सदर ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने अवैधरित्या दारूच्या साठा गोळा करून बंदीच्या दिवशी दारू विक्री करण्याकरिता लपवून ठेवल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध पो.स्टे. वाडी अप. क्र. १६५ / १९ कलम ६५ ( ई ) म.दा.का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला .
असे एकूण २१ हजार १९२ रूपयाचा मुद्येमाल पोलीसांनी जप्त केले.सदर कार्यवाहीत पोलीस उपआयुक्त परिमंडळ क्र.१ विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त एमआयडीसी विभाग सिद्धार्थ शिंदे व वाडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात पीएसआय अमोल लाकडे,अनिल गजभिये, महेंद्र सडमाके, जितेंद्र दुबे,नारायण पारवेकर व सुनिल नट,दिलीप आडे यांनी कामगिरी पार पाडली.