वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:
पोलीस स्टेशन वाडी अंतर्गत येणाऱ्या सूरक्षा नगर येथे एका घरात पती -पत्नीचा खून झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनूसार मृतक पतीचे नाव शंकर चंपाती वय अंदाजे ७० तर मृतक पत्नीचे नाव सीमा चंपाती वय अंदाजे ६० असून मृतक शंकर चंपाती हा दत्तवाडी चौकात नारीयल पाणीचा व्यवसाय करायचा पत्नी ही घरीच रहायची.मृतक दांम्पत्यास एक मुलगीप्रियंका चंपाती वय २५ असून ती नोकरी करते.
एकदा शंकरचा अपघात झाल्याने शंकर घरीच रहायचा मध्यंतरी कुणीतरी मृतकास मारायची धमकी दिल्याची माहिती पुढे येत असून त्या संदर्भात पोलीस स्टेशन मध्ये एनसी मॅटरचे प्रकरण दाखल झाले होते.मृतकांच्या डोक्यावर ठेचून लोखंडी रॉड नी मारल्याचे प्रथमदर्शी दिसत असले तरी एवढ्या वयोवृद्ध दांम्पत्याला मारण्याचा हेतू काय होता हे न समजण्यालीकडे आहे त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात असून सकाळी मुलगी जॉब वर गेली व रात्री ८ वाजता आली असता ही घटना उघडकीस आली त्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण येऊन घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.घटनास्थळी पोलीस उपआयुक्त झोन १ विवेक मासाळ व वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंन्द्र पाठक सह कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला.तसेच घटनास्थळी आयकरची गाडी तपासासाठी आली होती.