Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल १४, २०१९

पोलिसांच्या ढिसाळ वाहतूक नियोजनाचा चंद्रपूरकरांना फटका

चंद्रपूर/प्रतिनिधी:

वाहतूक नियोजन विभागाच्या निष्क्रिय कारभारामुळे शहरातील वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला.शनिवारी रामनवमीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा शहरातील विविध भागातून काढण्यात आल्या होत्या .या शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून परत आपल्या प्रभागात जातात अश्यातच पोलिसांनी विविध ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांना तैनात केलं होत,मात्र खोळंबलेल्या वाहतुकीला चंद्रपूर पोलिसांकडून तत्काळ प्रतीसाद न मिळाल्याने जवळपास एक तास अंचलेश्वर गेटवर वाहतूक कोंडी झाली.

ह्याच वाहतूक कोंडीचा सामना चंद्रपूर शहरातील गांधी चौक,अंचलेश्वर,गेटपुरा गेट,यासह अन्य ठिकाणी बघायला मिळाला वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना तासनतास गर्दीत ताटकळत उभे रहावे लागले.त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला व वाहतूक पोलीस व चंद्रपूर पोलिसांवर याचा रोष निघू लागला.

सध्या शहरात चैत्र पोर्णिमे निमित्य महाकाली मंदिर सुरु आहे,या यात्रेला दर्शनसाठी येथे विदर्भ,मराठवाडा,आंध्रप्रदेश,यासह अन्य ठिकाणहून भाविक मोठ्या संख्येने अंचलेश्वर परिसरात दाखल झाले आहे. यात्रेची गर्दी व रामनवमीनिमित्त निघालेली रॅली बघण्यासाठी इतर लोक घरून बाहेर पडले होते,मात्र चंद्रपूर वाहतूक विभागाचा चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना चांगलाच फटका बसला, या वाहतूक कोंडीला तत्काळ प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांना थेट SP परियंत फोन लावावा लागला.

असे जरी असले तरी मात्र रविवारी होणार असलेल्या बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य शहरात भव्य मिरवणुका निघणार आहेत. त्यासाठी कार्यक्रमात गर्दीत वाहतुकीचा खोळंबा होणार नाही, याची चंद्रपूर पोलिसांनी नोंद घेणे गरजेचे आहे. 

पोलिसांना जरी होमगार्ड जवानांची साथ असली तरी मात्र पोलीस जितक्या दबक्याने काम करू शकतात तितक्या दबक्याने होमगार्ड जवान काम करू शकत नाही,सोबतच होमगार्डचे कुणी ऐकत नसल्याने ते काम मन लावून करू शकत नाही. त्यामुळे जरी शहरात होमगार्ड असेल तरी मात्र त्यांना पोलिसांच्या हाताखाली देणे गरजेचे आहे.

म्हणून होतोय गोंधळ

थकलेल्या पोलिसांना लोकसभा निवडणूक बंदोबस्त,रामनवमी निमित्य बंदोबस्त,सोबतच १४ एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य बंदोबस्त करता करता आज पोलिसांवर पुन्हा ताण आला आहे,पोलिसांना तब्बल बारा तास ड्युटी करावी लागते. यासह सार्वजनिक सण, उत्सव, समारंभ,मोर्चे, आंदोलने, नेत्यांचे दौरे, कायदा सुव्यवस्था यामुळे जेवण, झोप नसल्यामुळे पोलिसांची चिडचिड वाढू लागली आहे.ड्युटीवर असताना वेळ मिळेल त्यावेळी कुठेही, काहीही खाऊन वेळ मारून नेण्याची वेळ पोलिसांवर येते. परिणामी पुरेसा पोषण आहार घेता येत नाही. याचा परिणाम म्हणजे थकवा जाणवणे, कार्यक्षमता मंदावणे, मानसिक ताण याला सामोरे जावे लागते.मात्र सेवेची शपथ खाल्लेल्या पोलिसांना कर्तव्यावरून पिछे हट करता येत नाही,त्यामुळे सलगच्या पोलीस बंदोबस्तात सध्या काम करू शकत नसल्याचे एका पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

रविवारी परत शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतुकीचे नियोजन करताना पोलिसांची कसरत होणार आहे. तसेच यंत्रणेवर बंदोबस्ताचा ताण राहणार आहे. मध्यवर्ती भागात ठिकठिकाणी वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतुकीचे र्निबध जारी करत वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे.

तपासापेक्षा बंदोबस्तावर भर

पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांसोबत तपास कामी बाहेर जायचे असते किंवा तपासात मदत करायची असते. मात्र, बंदोबस्तात कर्मचारी वाढविल्यामुळे तपासकामाला खीळ बसली आहे. अधिकारी एकटे पडले आहेत तर कर्मचाऱ्यांना बंदोबस्ताचा ताण सहन करावा लागत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.