चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरापासून मुसळधार पाऊस सुरु असून, नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. नद्यांना पूर देखील आलेला आहे. कोरपना तालुक्यातील पकडीगुडम धरण सध्या १०० टक्के भरले असून, ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लो सुरु होताच गावातील व परिसरातील नागरिकांनी मासे पकडण्यासाठी सांडव्यावर मोठी गर्दी केली. वयस्क व्यक्तींनी अंगावरील धोतर सोडून मासेदेखील पकडले.
Chandrapur:
Amid heavy rains in parts of Maharashtra, a video has surfaced which shows several people standing dangerously close to the water discharged from Pakadigudam dam in Chandrapur, with some of them even entering it, in order to catch fish.
कोरपना - जिवती तालुक्याच्या अगदी सिमारेषेत निसर्गरम्य माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी पकडीगुडम धरण आहे. १९८० च्या दशकात तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री कमलनाथ यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाली होती. १९८९ ते १९९२ दरम्यान प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे काम करण्यात आले. १९९३ ला प्रत्यक्षात पाणी संचयनास सुरुवात झाली. या प्रकल्पातून इंजापूर व लोणीकडे जाणारे दोन मुख्य कालवे तर अनेक शेती सिंचन कालवे काढण्यात आले. या धरणाची साठवण क्षमता ११.७९७ दलघमी इतकी आहे. आजघडीला धरण १०० टक्के भरले असून, ओव्हरफ्लो सुरु आहे.
Heavy rains over the past few days have led to reservoirs filling to the brim at several places in the district. The authorities have been releasing water from Pakadigudam dam located in Korpana tehsil.
हा सिंचन प्रकल्प हा शेती सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणारा प्रकल्प आहे. शिवाय तो पर्यटकांसाठी मौजेचा ठिकाण आहे. सध्या अतिवृष्टीमुळे सांडव्यातून पाणी वाहत असून, पावसाळी पर्यटनासाठी नागरिकानी गर्दी केली आहे. इतकेच नव्हेतर मासोळ्या पकडण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालून पाण्यात उतरले आहेत. सुमारे दीड ते दोन क्विंटल मासोळी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज आहे. एकीकडे पावसाने आणि पुराने जनजीवन विस्कळीत आहे, तर दुसरीकडे त्याच अतिवृष्टीचा फायदा घेतला जात असल्याची विसंगती यानिमित्ताने बघायला मिळत आहे. सध्या या सामूहिक मासेमारीचा व्हीडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. प्रकल्प शंभर टक्के भरले असल्याने नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात प्रवेश करू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. आणखी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून, यावेळी घराबाहेर न पडणे सर्वात सुरक्षित मार्ग असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
On Thursday, many people were spotted risking their lives by standing dangerously close to the water discharged from the dam, with some of them even entering it, carrying fishing nets in hands.
When asked about it, district collector Ajay Gulhane said, “An inquiry will be conducted in this connection and necessary measures will be taken to prevent people from entering the Pakadigudam dam.”
पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त आहे; मात्र या स्थानी पर्यटनविषयक कुठल्याही सोयी-सुविधा निर्माण करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे पर्यटकांचा हिरमोड होत आहे. यास्थानी बागबगीचा तयार करून बोटिंग आदी पर्यटन सुविधा करावी, अशी अपेक्षा पर्यटकांकडून व्यक्त होत आहे.
------------------------------
Heavy rain has been going on for a week in Chandrapur district and the rivers and canals are overflowing. Rivers are also flooded. Pakdgigudam dam in Korpana taluka is currently 100 percent full and has overflowed. As soon as the overflow started, the people of the village and the surrounding area thronged the sandwa to catch fish. Adults also caught fish leaving the dhoti on their body.
અતિભારે વરસાદ વચ્ચે પણ લોકો માછીમારી માટે કરી રહ્યા છે પડાપડી, જૂઓ વીડિયો...
મહારાષ્ટ્ર : હાલમાં, ચંદ્રપુર જિલ્લામાં પૂરની અસર (floods in Chandrapur district) થઈ છે અને તમામ સિંચાઈ યોજનાઓ છલકાઈ ગઈ છે. જીવતી તાલુકામાં પડગીગુડમ સિંચાઈ યોજના (Padgigudam Irrigation Project) તેમાંથી એક છે, પરંતુ અહીં લોકો કટોકટીમાં તકો શોધી રહ્યા છે. આ ઓવરફ્લો પ્રોજેક્ટને કારણે, લોકો માછીમારી કરવા માટે તેમના જીવનને જોખમમાં મૂકે છે. જીવતી તાલુકામાં પાકીગુડમ સિંચાઈ યોજના કોરપના અને જીવતી તાલુકામાં કામ કરે છે. આ પ્રોજેક્ટ માછીમારી માટે પણ પ્રખ્યાત છે. આ જગ્યાએ મોટા પ્રમાણમાં માછલી ઉછેર (fish farming) કરવામાં આવે છે. અહીં 5 થી 10 કિલો વજનની માછલીઓ જોવા મળે છે. નાગરિકોએ ARV માટે ચૂકવણી કરવી પડશે, પરંતુ હવે પ્રોજેક્ટ છલકાઈ રહ્યો છે. છેલ્લા કેટલાક દિવસોથી સતત પડી રહેલા વરસાદને કારણે આ સ્થિતિ વધુ ખરાબ છે. જેથી હવે કલાપ્રેમી માછીમારોની ભીડ જોવા મળી રહી છે. લોકો અહીં ધોતી, કપડાં, મચ્છરદાની અને જે મળે તે લઈને આવી રહ્યા છે અને કલાકો સુધી માછીમારીનો આનંદ માણી રહ્યા છે. પરંતુ તેઓ આ બધું પોતાના (જીવના જોખમે risk of lives) કરી રહ્યા છે.
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.