बसोली : माणुसपण जपणारी चळवळ
बसोली माहेरी माझे जमलेगा गाव
अंगी निर्मितीची आस घेते क्षितीजाचा ठाव
बसोली ,नाव तसं न उमजण्यासारखं पण मनावर गारुड घालणारं . माहेर हे फक्त स्त्रीयांच्याच नव्हे तर जगभरातल्या जवळजवळ दिड लाख मुलामुलीना हक्काच वाटणारं ,आपलं वाटणारं नाव म्हणजे बसोली . एखादी संस्था निर्माण होते काही काळ कार्य करते गाजते आणि लयाला जाते . पण गेल्या पंचेचाळीस वर्षात कार्याचा कर्त्तुत्वाचा आलेख सतत उंचावत ठेवुन बालकलावंताच्या सृजनशिलतेला वाव देणारी ,आकार देणारी , न कळत अनेक संस्कार सहजपणे प्रदान करुन समाजातल्या अनेक समस्यांची अगदी हसत खेळत जाणिव करुन देतानाच सामाजिक भान जपण्याचा मंत्र देणारी बसोली निव्वळ एक संस्था नव्हे तर सामाजिक चळवळ झाली यात नवल नाही .
ज्याला चालता येते तो अम्हाला चालतो ही आमची खासियत आहे . प्रत्येकाच्या मनात दडलेला भावाविष्कार कोणत्या ना कोणत्या माध्यमातुन प्रकट करण्याची प्रत्येकाला ईच्छा असते या प्रकटीकरणाला वयाचे बंधन नाही नेमके हेच मर्म जाणुन बसोलीचा कलाप्रवास सुरु झाला .आज मागे वळुन बघताना ज्या उद्दिष्टा साठी बसोलीची निर्मिती झाली ते उद्दिष्ट अनेक विविध कंगोऱ्यांनी सजून, बसोली एक सामाजिक बांधिलकी जपणारी सुजाण बालकांची आणि पालकांची आतमीय चळवळ म्हणुन नावारुपाला आली .
आम्ही फक्त रंगाशीच खेळत नाही ,फक्त रंगमंचावरच दंगा घालत नाही तर त्या रंगांचे स्वभाव जाणतो ,कोणता रंग कुठे वापरावा याचे तंत्रशुद्ध तारतम्य नसेल कदाचित ,पण त्या रंगाचे मन हे नेमक्या कुठल्या रंगावर बसलेय हे आम्ही जाणतो म्हणुनच घराघरातील हरवत चाललेला संवाद जपण्याचा संदेश आमच्या चित्रातुन आम्ही देतो . सहज ,साधा ,सोपा, सरळ आशय व्यक्त करणारी बसोलीची चित्रे म्हणुनच रसिकान्ना भावतात .छोट्या छोट्या हातांतुन निघालेला खुप मोठा संदेश सार्वत्रिक करण्यासाठी �
मग मोठमोठे , नावारुपाला आलेले प्रसिद्ध कलावंत या बच्चा पार्टी सोबत घेवून चित्रक्रांती घडवण्याचे महत्कार्य करुन जातात व त्यातुनच साकार होतात ते Orange City On Canvas , प्रदुषण थांबवा , एकात्मता एक्सप्रेस व या सारखे अनेक उपक्रम ! अशा प्रकारचे अनेक उपक्रम राबवताना बसोलीने बालकांसोबत पालकही जोडलेत . आईवडीलान्नी काढलेल्या रेखाचित्रातील नेमका आशय रंगकृतीद्वारे बाहेर काढुन बालक पालक यांचे भावविश्व एकमेकान्ना किती पूरक व अंतस्थ भावनेने जुळलेले असते ते प्रेमाचे ,मायेच्या ओलाव्याचे असलेले भावनिक नाते रंगरेषांच्या साह्याने उलगडुन दाखवण्याचही एक मनोवैज्ञानिक प्रयोग बसोलीने यशस्वी करुन दाखवला तो *माझा बाबा * या संकल्पनेवर आधारित बालकला शिबीराच्या माध्यमातुन . याखेरीज *नाना नानी दादा दादी डॉट कॉम* या संकल्पनेवर आधारित कलामहोत्सवात तीन पिढ्यांमधील भावबंधाचे आज दुर्मिळ होत चाललेल्या ऋणानुबंधाचे महत्व रसिकांसमोर ठेवतानाची या बाल अभिव्यक्तिची ताकद एव्हडी प्रचंड होती की त्या शिबीरानंतर वृद्धाश्रमात ठेवलेल्या आपल्या आई वडीलाना पुन्हा घरी आणुन नातवंडाच्या सहवासाचा आनंद प्रदान करुन देणारी दोन कुटुंबे बसोलीने एकत्र आणलीत याचा बसोलीला अभिमान आहे .
बसोलीचे निवासी शिबीर ही संकल्पना ज्या काळात रुजली त्या काळात असेही काही होवु शकते हे पचनी पडायला जरा कठीण होते आपल्या लहान मुलामुलीन्ना नागपुरच्या ऐन उन्हाळ्यात तब्बल बारा दिवस आपल्या नजरे आड दुर ठेवायचे . कशासाठी ? तर कला शिबीरासाठी. पण पहिल्या शिबीरापासुन बसोलीवर असलेला पालकांचा विश्वास कालांतराने ईतका दृढ झाला की त्या विश्वासाच्या बळावर शांतीनिकेतन पासुन ते मुंबई पर्यंतचे कलाजगत बसोलीने गाजवले .गुरुदेव रविंद्रनाथांच्या गीतांजली चा अर्थ लावताना भल्याभल्यांची जिथे कसोटी लागते तिथे त्यातील कवितांवर चित्र साकारण्याचे महत्कार्य बसोलीच्या ५० चिमुकल्यांनी अगदी सहज पणे करुन शांतीनिकेतन च्या कलाजगतात एक नवा ईतिहास निर्माण केला एव्हडेच नव्हे तर गुरुदेवांच्या सहजपाठ चे पु . ल देशपांडे यान्नी केलेल्या भावानुवादाला रविंद्र संगीताचा बाज देवुन त्यावरील नृत्यनाटीका तिथल्या चौपाल वर सादर केली आज चित्रकाराच्य रुपात मोठमोट्या कॅनव्हास वर गितांजली चित्रबद्ध करणारे चिमुकले हात दुसर्या दिवशी वाद्यांवर तेवढ्याच सफाईने फिरतात् व रविंद्र संगीताच्या सुरावटीवर हेच गळे आलाप छेडताना त्यातील काही आपल्या मनमोहक नृत्याविष्काराचे प्रदर्शन करतात हे बघुन तिथे नंदनमेला च्या निमित्ताने जमलेल्या जगभरातल्या नामवंत कलावंताची उस्फुर्त दाद घेवुन जातात यातच बसोलीच्या कलेशी जपलेल्या प्रामाणिक प्रयत्नाचे सफल सादरीकरण च म्हणावे लागेल.
बसोलीने बालकलावंत घडवले ते एका रात्रीतुन नव्हे तर तब्बल पंचेचाळीस वर्षांची तपस्या त्यामागे उभी आहे, त्यामागे उभी आहे जिद्द ,आस्था ,नवसृजनाची उर्मी आणि महत्वाचे म्हणजे उद्दिष्टाप्रती असलेले सातत्य . हे सर्व घडवणारी बसोलीची जन्मदात्री व्यक्ती म्हणजे आमच्या पिढीचे काका आणि कालौघानेच आजच्या पिढीचे आबा म्हणजे चंद्रकांत चन्ने .एक द्रष्टा दुरचे बघणारा व संवेदनेला आकारबद्ध रंगबद्ध करणारा मनस्वी कलावंत .
काळाच्या गतीने धावणारी आजच्या बालकांची कुशाग्र बुद्धी तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे कुठेतरी कुण्ठीत होवुन लोप पावतेय. त्या बालकाला सामाजिक जाणिवेपासुन दुर नेतानाच त्यातले बाल्य हरवतेय .निसर्गाशी एकरुप होण्यातला आनंद बालकान्ना घेता येत नाही ही जाणिव झाल्याबरोबर बसोलीने याविषयांच्या संकल्पना घेवुन त्यावर शिबीरांच्या माध्यमातुन कार्य करायला सुरुवात केली आणि मग मोबाईल नावाचा राक्षस ,प्रदुषण , तंत्रज्ञानाचा अतिरेक ,फास्ट फूडमुळे होणारे तोटे अशा अनेक विषयांवर शिबीरे घेतलीत व त्यातुन नृत्य ,नाट्य , शिल्प , चित्र ,कळसुत्री बाहुल्या गीते यांच्या माध्यमातुन संस्कार करण्याचे प्रकल्प हाती घेतलेतं .कठीण विषय सोपा करुन कसा हाताळायचा याचे प्रशिक्षणच या माध्यमातुन मुलान्ना मिळाले व त्याचा बालकांवर चांगला परिणाम झाला .यातले अनेक आज समाजामधल्या प्रत्येक क्षेत्रात नावलौकीक मिळवत मोठमोठ्या पदांवर विराजमान आहेत व आपापल्या क्षेत्रात आपल्या कार्याचा दबदबा ठेवुन आहेत हे येथे नमुद करायलाच हवे .
आज ज्या समस्या जे प्रश्न जगाला भेडसावत आहेत त्यांचा उहापोह बसोलीने खुप आधीच केलाय त्यावर जनजागृती केलीय साक्षरता ,रक्तदान महादान ,बेटी बचाओ बेटी पढाओ हे आणि यासारखे कितीतरी ..त्यातुन बालमनावर होणारे संस्कार हे कायमस्वरुपी कोरले गेले असतीलच बालकांशी एकरुप होवुन त्यांच्या दृष्टीने जगाकडे पाहीले तर जगणे सुलभ होते बालकांशी बालक होवुन राहील्यास त्यांच्या समस्या सहज लक्षात घेते ती बसोली
म्हणुनच *तारे जमिपर * हा चित्रपट बघितल्यानंतर कॅनडाहुन रात्री १ वाजता फोन करणारा जयवंत भरल्या गळ्याने सांगतो की काका , अमिरखान आज दाखवतोय ते बसोलीने ३०-३५ वर्षांपुर्वीच केलेंय .
पांढऱ्या वेषातल्या बालकांची बसोली, या पांढऱ्या रंगातून अनेक रंग सहज बाहेर काढते बसोली हा कलेचा प्रिझम आहे प्रत्येक रंग वेगळा ,त्याच्या अनेक छटांसह खुलवत नेते बसोली गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून अव्याहतपणे अविरतपणे बालकांची अभिव्यक्ती सृजनशिलता जपत त्याला अर्थपूर्ण आकार देण्याचे काम करतेय ती बसोली आज चौथी कलावंत पिढी जपतेय, त्यापिढीला रुजवत आधीच्या पिढ्या फुलवतेय ती बसोली .
बसोली बसोली
ऱंगोंकी टोली
कुछ खास रंगोकी
दुनिया निराली .............
Basoli children art group, Nagpur
Formed 15th may, 1975
Completing 45 years of its creativity
Started with 43 children, now it has crossed 1.5 lacks membership.
Awarded gold medals of 34 countries International children painting competition, many national awards, 5 balashree awards,
102 painting scholarship of HRD ministry, many state awards.
Projects on different themes : save girl, save water, petrol, beti bachao, happy parents, happy children, donate eyes and many more.
Started with children paintings, now working in all art forms. Dance, drama, sculpture, acting, filming, designing, puppetry etc.
Many are working in these field in India and abroad.
BASOLIAN Rajesh Mapushkar, director of ferrari ki sawari, Ventilator, asst. Director 3 idiots, munna bhai
Rajnish hedaoo, art director, winner of filmfare award for BHAG MILKHA BHAG, ART DIRECTOR of Bajrangi bhaijan, 3 idiots, sultan, tiger zinda hai, ferrari and many more with BASOLIAN Manindra jangam.
Swaroop joshi is running a beautiful sound recording studio in Pune, for Marathi films.
Abhijit guru, a serial actor and script writer of famous marathi serial माझ्या नवऱ्याची बायको.
RITVIK Sahore, a dangal and ferrari boy.
Ashay meshram, animation designer, winner of gold medal in Canada.
Gaurav chati, a famous gazal singer
Varennyam joshi, a villain in LITTLE SHOLEY
ANISHA PITALE, DEAN OF REKNOWN ART INSTITUTE" SHRUSHTI" OF BANGLORE.
MANY MORE ARE WORKING IN FAMOUS ART STUDIOS AND AGENCIES IN MUMBAI.
Transformation of poems of Ravindranath' s Geetanjali, Baba Amtes Jwala ani fule, Dr kalam wings of fire, atal Bihari Bajpeyis Meri Ekkavan Kavitayen, Kavi grace, Suresh Bhat etc.
Eldest Basolian is now 58 years old.
Family of Three generations.
Now working on Hrd ministry's child theme:
Happy parents, happy child..
Recently had a beautiful project related to this...
WORDS, DIALOGUES AND TRANSFORMATIONS.
Had six workshops in London and paris for indian children abroad.
8 days camp in Quatar.
Dignitaries who visited basoli:
Dr abdul kalam, atal bihari vajapeyi, baba amte, nana patekar, amol palekar, boman irani, dr shriram lagoo, babasaheb purandare, jabbar patel, shatrughn sinha, V Shantaram, and many more.
Chandrakant Channe