तरुणीसह चार मित्रांचा नदी पात्रात बुडून मृत्यू ।
Four Drowned In Kanhan River
नागपूर । जिल्ह्यातील वाकी परिसरात सहलीला गेलेल्या चार मित्रांना नदी पात्रात (Four Drowned In Kanhan River) पोहण्याचा मोह जीवावर बेतला. वाकी परिसरात फिरायला गेलेल्या सहा जणांपैकी चाैघे कन्हान नदीच्या डाेहात बुडाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. विजय ठाकरे (१८), साेनिया मरसकाेल्हे (१७, दाेघेही रा. नारा, नागपूर), अंकुश बघेल (१७) व अर्पित पहाळे (१९, दाेघेही रा. कामठी) अशी बुडालेल्यांची तर साक्षी कनाेजे (१८, रा. पाटणकर चौक, नागपूर) व मुस्कान राणा (१८, रा. जरीपटका, नागपूर) अशी बचावलेल्या विद्यार्थिनींची नावे आहेत. हे सहाही जण मित्र असून, ते दाेन माेटारसायकलींनी ट्रिपल सीट गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वाकी येथे फिरायला आले हाेते. त्यांनी ताजुद्दीनबाबांच्या दर्ग्यात दर्शन घेतले आणि कन्हान नदीच्या काठावर फिरायला गेले.
LATEST POSTS
कन्हान नदीपात्रातील (Four Drowned In Kanhan River) खोल डोहात बुडाल्याने या 4 जणांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये तीन तरूण आणि एक तरूणी आहे. घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांचे शाेधकार्य सुरू करण्यात आले.अंधार हाेईपर्यंत शाेधकर्त्यांच्या हाती काहीही गवसले नाही.पोलिसांनी एसडीआरएफ व स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने चौघांच्याही मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र सायंकाळी अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफची टिम, एक पीआय, दोन पीएसआय, 22 पोलिस शिपायी आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर आणि कामठी येथील सहा जणांचा ग्रुप वाकी (Four Drowned In Kanhan River) येथे सहलीसाठी आला होता. यामध्ये तीन मुले आणि तीन मुलींचा समावेश होता. विजय ठाकरे, सोनिया मरसकोल्हे, अंकुश बघेल, अर्पीत पहाले ही मृतकांची नावे आहे.कामठी व नागपूर येथील हे सहा मित्र कन्हान नदीच्या पात्रात फिरायला आले. नदीजवळ पोहोचताच चौघांना पोहायचा मोह आवरला नाही. त्यातील सहा पैकी हे चौघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, चौघांनाही पाण्याचा अंदाज आला नाही. खोल पाण्यात गेल्याने ते बुडू लागले. सोबतच्या अन्य मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांचा जीव वाचवता आला नाही.
वर्धा नदीत बुडालेल्या चौघाचे मृतदेह सापडले
वणी : दोन वेगवेगळ्या घटनेत नदीवर पोहण्यासाठी गेलेले चार तरुण वाहून गेले. ही घटना मंगळवारी स्वातंत्र्य दिनी सायंकाळी वणी तालुक्यातील नायगाव (खु.) व जुनाडा येथे घडली. ही दोनही गावे वर्धा नदीच्या काठावर आहेत. पैकी जुनाडा येथून वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह तसेच नायगाव येथून वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले असल्याने वणी तालुका या घटनेने हादरून गेला आहे.
रितेश नत्थू वानखडे (१८) व आदर्श देवानंद नरवाडे (२०) दोघेही रा. भद्रावती (जि. चंद्रपूर) अशी येथून वर्धा नदीत वाहून गेलेल्या तरुणांची नावे आहेत. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. नायगाव खुर्द येथील प्रविण सोमलकर (३६) दिलीप कोसरकर (४०) हे दोघे वर्धा नदीत वाहून गेले. असून याचा शोध घेतला दिलीप याचा मृतदेह हा माजरी इथे सापडला असून तर प्रविणचा मृतदेह कोणा येथे वर्धा नदी काठावर आढळून आले आहे .याघटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी सुटी असल्याने अनेकजण पर्यटनासाठी नदी तसेच धबधब्यावर जातात. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने नदीच्या जलपातळीत चांगलीच वाढली आहे. या प्रवाहात पोहण्याचा मोह न आवरता आल्याने ही दुर्घटना घडली.ब्युरो रिपोट प्रतिनिधी हिंगणघाट वर्धा
माओवादी नेता मल्ला राजिरेड्डी यांचे निधन?
माओवादी नेता आणि केंद्रीय समिती सदस्य मल्ला राजिरेड्डी (70) उर्फ सायन्ना यांचे निधन झाल्याचे समजते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. राजा रेड्डी यांच्या मृत्यूबाबत माओवादी पक्षाने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
मल्ल राजिरेड्डी यांचे मूळ गाव पेड्डापल्ली जिल्ह्यातील मंथनी मंडळातील एगलसपूर अंतर्गत शास्त्रुलापल्ली आहे. छत्तीसगड आणि ओडिशा दंडकारण्यममध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संग्राम, सायन्ना, मीसला सायन्ना, आलोक, उर्फ देशपांडे, सटेना यांना ओळख मिळाली.