Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट १७, २०२३

विमान उडण्याआधी पायलटचा या कारणामुळे मृत्यू; आठवड्यात तिघांचा मृत्यू; नागपूर विमानतळावर घटना | Nagpur Airport



आठवड्याभरात 3 वैमानिकांच्या आकस्मिक मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मृतांमध्ये दोन भारतीय वैमानिकांचा समावेश आहे. बुधवारी कतार एअरवेजच्या वरिष्ठ पायलटचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. वैमानिक दिल्लीहून दोहाला उड्डाण करत असताना विमानातच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्यांचा मृत्यू झाला. मात्र, वैद्यकीय आणीबाणीनंतर विमान दुबईकडे वळवण्यात आले.

Nagpur-Pune Flight:
नागपूर विमानतळावर बोर्डिंग गेटवरच पायलटचा मृत्यू झाला. मृत वैमानिक नागपूरहुन पुण्याला इंडिगो कंपनीचे विमान घेऊन जाण्यासाठी सज्ज होते. मात्र,विमानात बोर्ड होण्यापूर्वीचं ते बोर्डिंग गेट जवळ कोसळले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. कॅप्टन मनोज सुब्रमनियम अस मृत पायलटचे नाव आहे. Captain Manoj Subramaniam


मृत्यूचे प्राथमिक कारण कार्डियाक अरेस्ट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पोस्ट मोर्टेम नंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. सुब्रमनियम यांनी बुधवारी त्रिवेंद्रम-पुणे-नागपूर या अशा दोन सत्रात उड्डाण केले. पहाटे 3 ते 7 या दरम्यान त्यांनी हे उड्डाण केले. त्यानंतर त्यांनी 27 तास विश्रांती घेतली. यांनतर आज ते नागपूर पुणे असे उड्डाण भरणार होते. डुयुटीवर जात असतानाच ते बोर्डिंग गेटवरच अचानक कोसळले.  विमानतळावरील ग्राउंड स्टाफच्या मदतीने  सुब्रमनियम यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. 

जो वैमानिक विमान घेऊन उड्डाण करणार होता त्याचाच मृत्यू झाल्यामुळे विमानतळावर गोंधळ उडाला. अखेरीस नियोजीत वेळा पेक्षा 15 ते 20 मिनीट उशीराने या विमानाने उड्डाण केले. इंडिगो एयलाईन्सने शोक व्यक्त केला आहे. 

विमान हवेत असतानाच पायलटचा मृत्यू
विमान हवेत उड्डाण करत असतानाच वैमानिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. LATAM एअरलाइन्सच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर  कॅप्टन Ivan Andaur यांचा मृत्यू झाला. विमान हवेत उड्डाण करत असतानाच वैमानिकाची प्रकृती बिघडली.  यानंतर विमानाचं तात्काळ पनामा स्थानकावर लँडिंग करण्यात आलं.


छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील भोपालपट्टनम पोलीस ठाण्यांतर्गत दम्मूर-बारेगुडाच्या जंगलात पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने दबा धरून बसलेल्या नक्षल्यांचे शिबीर उद्ध्वस्त करण्यात छत्तीसगड आणि गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.