Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १४, २०२०

इको-प्रो व एफईएस महाविदयालयाचा ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम





युवकांनी आदर्श घेण्याची गरज - शहरातील प्रेमाचे प्रतिक असलेल्या वास्तुवर पुष्पअर्पण

चंद्रपूरः शहरात गोंडकालिन ऐतिहासिक वास्तु असलेली गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या समाधीवर ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम अंतर्गत इको-प्रो संस्था व एफईएस गल्र्स महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विदयार्थीनीनी पुष्पअर्पण करून कार्यक्रम साजरा केला.

आजच्या युवकांना प्रेमदिनाच्या निमीत्ताने क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, प्रत्येक नात्यातील प्रेम वृध्दीगंत करण्याकरिता विशीष्ट दिवसाची गरज नसुन, पाच्छिमात्याचे अनुकरण न करता विदयाथ्र्याना योग्य संदेश देता यावा म्हणुन दरवर्षी गोंडराजे यांचे समाधीस्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रेमाचे प्रतीक असलेले राजे बिरशहा यांची समाधी राणी हिराईने त्यांच्या मृत्युनंतर या वास्तुचे सुंदर असे बांधकाम केले होते. ताजमहलच्या नंतर त्याच तोडीची गोंडवानातील सुंदर आकर्षक अशी वास्तु बांधुन न थांबता राजेच्या मृत्युनंतर राज्यकारभार योग्य रित्या सांभाळत अनेक विकासकामे केलेली आहेत. अनेक मंदीराचा जिर्णोध्दार सुध्दा केलेला आहे, राणी हिराईचा कार्यकाळ चंद्रपूरच्या इतीहासात नोंदवीला गेलेला आहे. राणी हिराईने आपल्या कार्यातुन आपल्या पतीप्रती असलेले प्रेम अजरामर केले आहे. राणी हिराईचा हा आदर्श आजच्या युवकांनी-युवतीनी घेण्याची गरज आहे.

‘‘चंद्रपूर शहरात असलेली ही प्राचीन पुरातन वास्तु खÚया अर्थाने आपला वारसा संवर्धनाचा तसेच आपल्या कार्यातुन राजा बिरशहा व राणी हिराई यांच्यातील प्रेम अजरामर करून ताजमहलच्या तोडीची वास्तु निर्माणा सोबतच पुढील काळात योग्य राजकारभार करून या राणीने बांधुन एक आदर्श घालुन दिलेला आहे’’ असे मत अॅड विजय मोगरे यांनी सलाम राणी हिराई या कार्यक्रमादरम्यान आपल्या मनोगतात व्यक्त केले. ‘‘राणी हिराई आणि राजा बिरशहा यांच्यातील प्रेमचं होत की जे मृत्युनंतरही अजरामर झाले आहे, त्याच्या कार्यातुन ते सतत जिवंत राहणार आहे. आजच्या दाम्पत्यांनी तसेच युवकांनी अशा स्थळांना, स्मारंकाना भेट देत आपल्या जिवनात, हा आदर्श घेण्याची गरज असल्याचे, मत यावेळी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी व्यक्त केले. यावेळी महाविदयालयाच्या प्राचार्या डाॅ सरोज झंझाळ यांनी सुद्धा या कार्यक्रमाचे महत्व विद्यार्थांना सांगितले यावेळी प्रा. डाॅ मुंकुद देशमुख, प्रा. डाॅ बारसागडे,  प्रा डाॅ प्रमोद रेवतकर, प्रा डाॅ सचिन बोधाने, प्रा. डाॅ मेघमाला मेश्राम, प्रा. डाॅ सुवर्णा कायरकर, प्रा. विदया जुमडे व इको-प्रो चे नितीन रामटेके, विनोद दुधनकर, सुमीत कोहळे, कपील चैधरी, अमोल उटटलवार, आकाश घोडमारे, गौरव वाघाडे, सचिन धोतरे, आशीष मस्के, स्वप्निल रागीट, मनिषा जयस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.