समृध्दी महामार्गाचे काम सुरू असताना क्रेन कोसळली, 17 कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
समृध्दी महामार्ग सुरू झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून या महामार्गावर अनेक ठिकाणी अपघात होऊन कित्येक लोकांचा जीव गेल्याचं समोर आलं आहे. अशात आता आणखी एक मोठी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गाचे काम चालू असताना ब्रीजवरू क्रेन खाली पडल्याने 17 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. ब्रीजचे गरडर जॉइंट करणारे क्रेन साधारण 100 फूट वरून खाली पडले आहे.
Samruddhi Mahamarg Third Phase Thane : ठाण्याजवळ शहापूर (shahapur) तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडलीय. पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण गर्डर मशिनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेच दिली. गर्डर मशिनखाली दाबले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्रथम प्राधान्य देत आहोत. ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल. तसेच मतृांच्या कुटुंबीयांना मदत देखील केली जाईल असे दादा भुसे म्हणाले.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडली आहे. शाहपूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. यामध्ये 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. त्याआधीच काही तास ही दुर्देवी घटना घडली आहे.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु
दरम्यान, सध्या NDRF कडून डॉग स्कॉडच्या माध्यमातून पुलाच्या ढिगाराखाली सर्च ऑपरेशन सुरु आहे. आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे TDRF ची एक तुकडी घटनास्थळावर दाखल झाली आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु आहे. हे काम येत्या डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा शंभर किलोमीटरचा टप्पा आहे. डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण 600 किमीचा रस्ता खुला झाला आहे.