Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, फेब्रुवारी १४, २०२०

निकृष्ठ दर्जाचे गुपचूप ! लहान मुलांच्या आरोग्यास धोका #health



खापा (घुडन)
नरखेड तालुक्यात अनेक खेडे गावात बाहेरील उत्तर प्रदेश येथील परप्रांतीय गुपचूप विक्रेते आपला व्यवसाय करण्यास आले त्यांनी परिसरातील अनेक मोठी गाव पकडली यात जलालखेडा ,भारसिंगी ,लोहारी सावंगा, अशी आणेल गावे आहेत ,त्याच सोबत हे परप्रांतीय गुपचूप विक्रेते मोटर सायकल वरून गुपचूप विक्रीचे काम हे परिसरात अनेक लगतच्या खेडे गावात सुद्दा करतात ,पण यांच्या विक्रीला असणारे गुपचूप हे अतिशय निकृष्ट दर्जाचे तर यात वापरले जाणारे पाणी दूषित असल्यास जनतेकडून सांगण्यात येत आहे ,

"वापरन्यात येणाऱ्या वाट्या (प्लेट ) साफ नसतात ,,, प्रदीप बोबडे , खापा (घुडंन)
  खापा (घु) येथे विक्रीला येत असलेला  गुपचूप विक्रेता हा परप्रांतीय असून जलालखेडा येथे राहवतील आहे ,त्याचे नाव विचारल्यास सांगायला तय्यार नाही , (नाम पुच्छके क्या करोगे )अशी उत्तर हे देतात ,,,,, तो स्थानिक गावात नियमित गुपचूप विक्रीला येतो पण ज्या वाटीत (प्लेट) मध्ये हा लहान मुलांना गुपचूप चारत असतो ,त्या वाट्या अतिशय घाण असतात यांच्या वाट्या एकदम गढूर पाण्याने धुतल्या जात असतात .

   अतुल गोरे ,,, खापा 
          गुपचूप म्हटले की म्हाताऱ्या व्यक्ती पासून तरुण लहान मुलांच्या तोंडाला पाणी आल्या विना राहत नाही पण ,गावात मोटार सायकल घेऊन फिरणारे गुपचूप विक्रेते यांच्या चटणी मध्ये वापरले जाणारे आलू हे अतिशय खालच्या दर्जाचे असून ते सडकी असतात आणि त्याच आलूचा ते चटणी मध्ये उपयोग करीत असतात ,यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते .

*निगडित प्रशासन देईल का लक्ष *

       सदर गुपचूप विक्रेते हे आपली मनमानी करून स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका पोहचविण्याचा अथाक प्रयत्न करीत आहेत त्यामुळे खेडे गावातील अनेक चुपचुप चाहते (आवडीक )नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो ,दूषित पाण्यामुळे आरोग्याला अनेक अपायकारक रोग तथा गलीच्छ पणे हातानी मिळणाऱ्या वागणुकीमुळे अनेक नवनवीन आजार उद्भवू शकतात असे स्थानिकांचे मत आहे ,त्यामुळे लगेचच या परिसरात मोटार सायकल वर गुपचूप विक्री करणाऱ्यावर आडा घालण्यात यावा अशी परिसरातून मांग केली जात आहे .

अमरजित जांभूळकर ,खापा (घुडन) 
९०२११६६१४४,९८६०८४८२४२,

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.