Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ३१, २०२३

भु-वैकुंठ अड्याळ टेकडी हडपण्याचा विरोधकांचा प्रयत्न चालू देणार नाही

भु-वैकुंठ अड्याळ टेकडी हडपण्याचा विरोधकांचा प्रयत्न चालू देणार नाही


३१ मे व १ जूनला  सत्संग भवन अड्याळ टेकडीवर  टाळ भजनाने अहिंसक सत्याग्रह  करणार

भु-वैकुंठ आत्मनुसंधान अड्याळ टेकडी च्या संचालक मंडळाची पत्रकार परिषद


ब्रम्हपुरी :- वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी पु.तुकारामदादा गीताचार्य यांना तत्वज्ञानाची स्वतंत्र जबाबदारी देऊन १९६७ मध्ये भु-वैकुंठ अड्याळ टेकडीवर बारा वर्षाच्या मौन साधनेत बसवले. रजिस्ट्रेशन,संस्था,ट्रस्ट,सरकारी अनुदान,मानधन न घेता केवळ लोकशक्तीच्या तम मन धनातून आज तेथे प्रचंड कार्य व वैभव पु.तुकारामदादांनी उभे केले.सन २००६ मध्ये पु.तुकारामदादांच्या निर्वाणानंतर त्यांच्याद्वारे संस्थापित भु-वैकुंठ अड्याळ टेकडी,अध्यात्म गुरुकुल मोझरी,सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर इत्यादि स्वायत कार्यरचलावर सद्या अतिक्रमण ताबा कब्जा करण्याचा सपाटा अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळ संस्था,मोझरी (जि.अमरावती) चा स्वार्थी,भ्रष्ट,पदाधिकाऱ्यांनी चालविला आहे.अशी माहिती भु-वैकुंठ आत्मनूसंधान अड्याळ टेकडीच्या पदाधिकारी यांनी विश्रांमगृहात पत्रकार परिषदेत माहिती दिली.
      त्यासाठी त्यांनी २०१० पासून अड्याळ टेकडीवर कोर्ट केसेस सुरु केल्या. अनेक वेळा न्यायालयाने त्यांची केस खारीज केली असतांना देखील या जिल्ह्यातील काही स्वार्थी प्रवृत्ती व राजकिय सत्ताधाऱ्यांना हातात घेऊन भु-वैकुंठ अड्याळ टेकडीच्या कार्य-कार्यक्रमांत अडथळा निर्माण करणे,अड्याळ टेकडीवरील ७/१२ बदलवून त्यावर अखिल भारतीयचे नाव चढविणे,अड्याळ टेकडीची सर्व स्थावर जमीन संपत्ती अखिल भारतीय संस्था मोझरीच्या नावे बेकायदेशीररीत्या केले आहे.अशाद्वारे या चालू वर्षाच्या गुडीपाढवा उत्सवात त्यांनी व्यत्यय निर्माण केला.गुरुदेवाच्या कृपेने अड्याळ टेकडीच्या बदललेल्या ७/१२ प्रकरणात जिल्हाधिकारी चंद्रपूर तर्फे स्थगणादेश प्राप्त झाला व अड्याळ टेकडीची जमीन संपत्ती अखिल भारतीय संस्थेच्या नावे करणाऱ्या अमरावतीच्या धर्मदाय आयुक्त प्रकरणात नागपूर खंडपीठाने आपणास स्थागणादेश दिला.त्यामुळे सद्या परिस्तिथीत भु-वैकुंठ अड्याळ टेकडी ही अखिल भारतीय संस्थेच्या ताब्यातून अगदी सुरक्षित आहे.
     सत्संग भवनाचे ७/१२ अखिल भारतीय संस्था या नावाने असले तरी त्यासंबंधी केलेल्या लोकन्यायालायाच्या निर्णयाविरुद्ध चंद्रपुर कोर्ट मध्ये दावा प्रलंबित आहे.या विरोधकांनी एक्झीक्युशन फाईल केली नाही आणि ते करूही शकत नाहीत.गेल्या ५५ वर्षांपासून ताबा व वहिवाट आमच्या ग्रामगीताप्रणित भु-वैकुंठ समितीची होती,आजही आहे आणि पुढेही राहील,येथे सर्व लोकांचा प्राण गेला तरी बळजबरीने ताबा मिळणार नाही याची विरोधकांनी नोंद घेतली पाहिजे.
       असे असतांना सुद्धा गेल्या १७ वर्षापासून अव्याहत प्रत्येकवर्षी ८ जूनला होत असलेल्या हजारो गुरुदेव भक्तांच्या श्रद्धा कार्यक्रम म्हणजे कर्मयोगी संत तुकारामदादा गीताचार्य यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला गालबोट लावण्यासाठी या समाजकंटकांनी यावर्षी १ जूनला पुण्यतिथी उत्सव घेण्याचे सोंग उभे करून लोकांमध्ये भ्रम निर्माण केला आहे.
       चंद्रपूर जिल्ह्यातील मोझरी म्हणजे भु-वैकुंठ अड्याळ टेकडी ही चंद्रपुर जिल्ह्यातील अस्मिता आहे.ही कोण आली अखिल भारतीय संस्था मोझरी? काय आहे यांच्याशी आपला संबंध? कसे बदलले ७/१२? कोणाची पुण्यतिथी करत आहेत हे? आणि गेल्या १७ वर्षापासून कोठे होती यांची पुण्यतिथी आणि हे लोक?यांची विचारपूस करून यांना धडा शिकवण्यासाठी येत्या ३१ मे व १ जूनला पु.तुकारामदादांच्या सर्व प्रेमींनी आवर्जून सत्संग भवन अड्याळ टेकडीवर उपस्थित राहावे व टाळ भजनाने अहिंसक सत्याग्रह करून यांचा विरोध निषेध करावा यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करीत आहोत.खंडपीठ व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली करून विनापरवान्याने कार्यक्रम घेणाऱ्या या समाजकंटकांना धडा शिकवण्यासाठी सर्व गावातील शहरातील अड्याळ टेकडी प्रेमींनी अड्याळ टेकडीवर उपस्थिती दर्शवावी अशी माहिती शासकिय विश्रामगृह ब्रम्हपुरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी सुबोधदादा मार्गदर्शक व संचालक भु-वैकुंठ अड्याळ टेकडी,डॉ.नवलाजी मुळे अध्यक्ष अड्याळ टेकडी,ऋषीजी राऊत जेष्ठ कार्यकर्ते,फाल्गुनजी राऊत आदी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.