Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ३१, २०२३

नवरगावच्या तरुणाने जिंकली 12 लाख 50 हजारांची रक्कम | kon honaar crorepati 2023

मोहित सोनवणे

कोण बनेगा करोडपतीच्या मराठी आवृत्तीला सुरुवात झाली असून, सचिन खेडेकर (Sachin khedekar) हे सूत्रसंचालन करीत आहेत. आज 29 मे रोजी सोमवारी पहिल्याच भागामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील मोहित सोनावणे या तरुणाने हॉट सीटवर बसण्याचा मान मिळवला आहे. इतकेच नव्हे तर दोन दिवस खेळ पूर्ण करून बारा लाख पन्नास हजारांची रक्कम जिंकली आहे. कोण होणार करोडपतीच्या माध्यमातून मोहित यांना स्वतःचे हक्काचे असे घर बांधायचे असुन, आयुष्यात एका नवीन पर्वाला सुरूवात करायची आहे.

मोहित सोनवणे असे त्याचे नाव असून तो पहिल्या व दुसऱ्याच दिवशी खेळला. त्याने स्वतः लाकडातून तयार केलेले एक हॉटशीटची प्रतिकृती सचिन खेडेकर (host Mr. Sachin Khedekar) यांना भेट दिली. यावेळी त्यांनी या शोच्या माध्यमातून चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती असलेल्या गोंडीगीताचे महत्त्व देखील सांगितले. kon honaar crorepati 2023


मोहित हा मूळचा नवरगाव (तालुका सिंदेवाही) येथील रहिवासी असून, 26 वर्षांचा आहे. यांत्रिक अभियंता असुन तो वडीलांच्या फर्निचर व्यवसायात मदत करतात. त्यांच्या कुटुंबात आई-वडील आणि बहीण आहे. मोहित यांनी यांत्रिक अभियांत्रिकी नागपूर येथून पुर्ण केले आहे.

कोण होणार करोपतीमध्ये त्याने 25 लाख रुपयांच्या प्रश्नपर्यंत अचूक उत्तरे देत पोहोचला. मात्र, 25 लाख साठी सचिन खेडेकर यांनी महाराष्ट्रातील कोणत्या माजी मुख्यमंत्र्यांचे सिंगापूर मध्ये निधन झाले? असा प्रश्न केला होता. मात्र मोहितला या प्रश्नाचे उत्तर ठाऊक नव्हते. त्यामुळे त्यांनी बदली प्रश्न ही लाईफ लाईन घेतली. तेव्हा त्याने मनोरंजन हे क्षेत्र निवडले. त्यात निर्देशक वी. शांताराम यांच्या कोणत्या चित्रपटाला कान फिल्म समारोहात उत्कृष्ट साऊंड रिकॉर्डिंग के कान ग्रैंड प्रिक्स पुरस्कार मिळाला होता, असा प्रश्न केला. याबाबत त्याला कोणतेही कल्पना नसल्याने त्यांनी व्हिडिओ फोन फ्रेंड ही लाईफ लाईन घेतली. मात्र निर्धारित वेळेत मित्राने देखील उत्तर सुचवू शकले नाही. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर मोहित मात्र संभ्रमात पडला होता. बक्षिसाची रक्कम मोठी होती आणि जर उत्तर चुकले असते तर थेट तो खाली आला असता. त्यामुळे माहितने गेम सोडण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी मोहित बारा लाख पन्नास हजारांच्या मोठ्या रकमेचा विजेता ठरला आहे.




वडीलांच्या दारूच्या व्यसनामुळे, अभियंता असूनही नाईलाजाने मोहित यांना वडीलांच्या फर्निचर व्यवसायात सहभागी व्हावे लागले. गावातील लोकं, जे वडीलांना या सगळ्यास बढावा देतात त्यांच्यापासून दुर राहता येणे गरजेचे आहे, म्हणून वडीलांच्या सुखकर आयुष्यासाठी, त्यांना कोण होणार करोडपतीच्या माध्यमातून एक घर बांधायचे आहे. त्यांना आई-वडीलांना आनंदी ठेवायचे असुन, आई वडिलांना अभिमान वाटावा म्हणून त्यांना कोण होणार करोडपती मध्ये भाग घ्यायचा होता आणि हे स्वप्न त्याने पूर्ण केले आहे. माहेर आणि सासर वगळता आईला कुठलेच नविन गाव माहीत नाही, म्हणून रक्कम जिंकून आई- वडीलांना देव दर्शनाला पाठवायचे आहे.

कौन बनेगा करोडपती कार्यक्रमात कंपेनियन म्हणून सोबत भुज येथील (ब्रम्हपुरी) येथील रहिवासी इंजी. अविनाश मस्के सोबत होते. मोहितच्या या यशाने संपूर्ण चंद्रपूरवासिची मान उंचावली आहे. मोहितचे सर्वत्र कौतूक होत आहे.

'कोण होणार करोडपती' | 29पासून | सोमवार ते शनिवार | 9PM
Big B ने Naveen को बताया ‘Kala Chashma’ गाने का किस्सा | KBC India
Mohit Sonawane is a mechanical engineer who helps his father in his furniture business.
#crorepati #billionaire #millionaire #business #successmindset #networkmarketing #money #enterpreunerlifestyle #selfachievers #businesslifestyle #successmotivation #youthmotivation #achievetheimpossible #enterpreuners #visiontoreality #dreamersmotivation #investment #ebizlifestyle #success #successformula #motivation #india #lifemotivation #leadership #instagram #dailymotivation #legends #thinkbig #entrepreneur #testimony |
Kaun Banega Crorepati | kon honar marathi karodpati | kon honar marathi karodpati 2023 | कोण होणार करोडपती | कोण होणार करोडपती सोनी मराठी 2023 | #कोणहोणारकरोडपती #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #vinuyaatutnati

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.