सुरुवातीपासूनच आक्रमक आणि जिगरबाज स्वभावाचा नेता म्हणून बाळू धानोरकर यांची ओळख होती. बाळू धानोरकर यांचा राजकीय प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला राहिला. त्यामुळेच त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते खंबीरपणे उभे होते. आज अंत्यदर्शनादरम्यान शोकाकुल होऊन त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर पार्थिवला काचेवरून स्पर्श करीत होत्या. त्याचवेळी एका कार्यकर्त्यांने सादर केलेले भावनिक गीत सर्वांचे डोळे पाणावून गेले.
पार्थिवाचे दर्शन |
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार |
Congress’s only Lok Sabha MP from Maharashtra, Balu Dhanorkar dies महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचा आज पहाटे नवी दिल्ली येथे रुग्णालयात निधन झालं. ते 48 वर्षांचे होते. दोन-तीन दिवसांपूर्वी मूत्रपिंडाच्या विकारांना प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना दिल्लीतला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. मात्र, आज पहाटे उपचारादरम्यान निधन झालं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर त्यांनी चंद्रपूर वर्णी आर्मी मतदार संघात विजय मिळवला होता. चंद्रपूरचे खासदार स्व. बाळू धानोरकर याचे पार्थिव नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयातून एआर अम्बुलंस च्या माधमातून नागपूरला आणण्यात आले. तिथून रस्ता मार्गाने थेट वरोरा येथे दाखल झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पूर्वनियोजित चंद्रपूर दौरा रद्द महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरोरा येथे आज सायंकाळी ६ वाजता खासदार बाळू धानोरकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार होते. असा पूर्वनियोजित दौरा होता. मात्र आज 31 मे 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पूर्वनियोजित चंद्रपूर दौरा रद्द करून इतरत्र वळविण्यात आला आहे. (OLD NEWS- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्या ३१ रोजी दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी शिर्डी विमानतळ येथून नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील. नागपूर विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर ते हेलिकॉप्टरने चंद्रपूर मोरवा विमानतळ येथे दाखल होतील. त्यानंतर पाच वाजून पन्नास वाजता मोरवा विमानतळ येथून मोटारीने वरोरा येथे जाणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता वाजून दहा मिनिटांनी खासदार सुरेश धानोरकर यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. यावेळी ते त्यांच्या कुटुंबीयांची आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांची सांत्वनपर भेट घेतील. या भेटीनंतर ते रात्री मोटारीने नागपूर येथे रवाना होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयातून देण्यात आली आहे) स्व. खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचे पार्थिव वरोरा येथे त्यांच्या घरी आणण्यात आले. आपल्या लाडक्या नेत्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी जनसागर उसळत आहे. आज अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महासचिव, माजी मंत्री मुकुल वासनिक, माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. अतिशय जड अंतःकरणाने कुटुंबीयांचे सांत्वन केले. पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे खासदार बाळू धानोरकर यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. ही बाब लक्षात घेता त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा यांना पाठविण्यात आले आहे.
चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांचे आज मंगळवारी दुखःद निधन झाले आहे. ते सन २०१४ मध्ये वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राचे शिवसेना पक्षाचे आमदार होते. त्यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान आहे. त्यांच्या अकस्मात निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार बुधवार, दिनांक ३१.०५.२०२३ ला वरोरा येथे करण्यात येणार आहे. त्यांनी भूषविलेले संविधानिक पद तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील कर्तुत्व आणि अतुलनीय योगदान लक्षात घेता त्यांची अंत्यविधी ही शासकीय इतमामात करणे अपेक्षित असल्याचे सदर निवेदनात आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले असून दिवंगत खासदार स्व. बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याकरिता तातडीने व्यवस्था करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून वाहिली श्रद्धांजली चंद्रपूरचे लोकसभा खासदार मा.बाळुभाऊ नारायणराव धानोरकर यांच्या निधनाने दु:ख झाले. सार्वजनिक सेवा आणि गरिबांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या संवेदना. ओम शांती, अशा शब्दात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाने दु:ख झाले. जनतेशी सखोल संबंध ठेवून, त्यांनी सामान्य माणसाच्या आशा पोहोचण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या निधनाने आपल्या सर्वांचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे, अशा भावना लोकसभा सभापती ओम बिरला यांनी व्यक्त केली. तृतीयपंथीयांचा आधारच हिरावला तृतीयपंथीयांचा आशीर्वाद फार शुभ असतो, असं मानलं जातं. एकीकडे त्यांचा आशीर्वाद घेणारा हाच समाज दुसरीकडे तृतीयपंथीयाकडे हीन भावनेने बघतो. त्यांचे दु:ख, वेदना शब्दात न सामावणारे असतात. हे सगळं डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातले काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी समाजाची दृष्टी बदलण्याकरिता पुढाकार घेतला होता. तृतीयपंथांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी खा. बाळू धानोरकर पुढे आले. स्वखर्चातून त्यांनी काही तृतीयपंथीयांना घरं बांधून दिलीत. खासदार बाळू धानोरकर यांनी स्वखर्चातून चंद्रपूर येथील रय्यतवारी कॉलनी येथे तृतीयपंथी बांधवांना घर बांधून देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार धानोरकरांच्या हस्ते एका तृतीयपंथीयाच्या घराचं भूमीपूजन झालं खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांनी समाजात वंचित घटक असलेल्या तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठं पाऊल उचललं होतं. समाजात तृतीयपंथीयांना सन्मान मिळावा, यासाठी धानोरकरांनी वेळोवेळी प्रयत्न केले आहेत. मिस्टर आणि मिसेस धानोरकर दाम्पत्य तृतीयपंथांना हक्काचा निवारा देण्यासाठी पुढे सरसावलेत. स्वखर्चातून तृतीयपंथीयांना घर बांधून देण्याचा निर्धार त्यांनी केला होता. मात्र, अकाली निधनानं तृतीयपंथीयांचा आधारच हिरावला आहे. Suresh alias Balu Dhanorkar, the lone Lok Sabha member for the Congress from Maharashtra, passed away early on Tuesday at a Gurgaon private hospital where he had been hospitalised due to complications from kidney stone removal surgery, a party leader said. He was 47 years old. Saddened by the passing away of Lok Sabha MP from Chandrapur, Shri Balubhau Narayanrao Dhanorkar Ji. He will be remembered for his contribution to public service and empowering the poor. Condolences to his family and supporters. Om Shanti. - चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना अत्यंत दुखद घटना आहे. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी एयर अॅम्बुलन्सद्वारे त्यांचं पार्थिव आणण्यात येईल. यानंतर उद्या वरोरा येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूरमार्गे वरोरा येथे दुपारी 1.30 वाजता आणण्यात येणार आहे, येथे दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 31 मे रोजी वणी - वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.
चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदार होते. 48 वर्षाच्या अल्पवयात त्यांनी कट्टर शिवसैनिक ते खासदार असा थक्का करणारा प्रवास केलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती हे त्यांचे मूळ गाव. ४ जुलै १९७५ रोजी वणी जिल्हा यवतमाळ येथे त्यांचा जन्म झाला. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा प्रवास करीत युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. 2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली. लोकसभेतील काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार असलेले बाळू धानोरकर हे अनेक वर्षे शिवसेनेत होते. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिलं. 2014 ते 2019 दरम्यान ते वरोरा मतदारसंघाचे शिवसेना आमदार होते. विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री संजय देवतळे यांचा त्यांनी पराभव केला होता. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बाळू धानोरकर काँग्रेसच्या तिकीटावर लढले आणि माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांना पराभूत करुन खासदार झाले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे कॉंग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांची साथ व भक्कम जनसंपर्क या बळावर त्यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला. राज्यात काँग्रेस लोकसभेत शून्य झाली असताना आश्चर्यकाररित्या बाळू धानोरकर राज्यातील एकमेव काँग्रेस खासदार ठरले. लगेच झालेल्या निवडणुकीत त्यांनी आपल्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसची तिकीट खेचून आणत आणि जिंकत वरोरा-भद्रावती हा त्यांचा मतदारसंघ स्वतःकडे कायम ठेवला. लोकसभेत आपल्या विविध भाषणाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धोरणावर टीका , मतदारसंघाचे प्रश्न, विदर्भाचे मुद्दे त्यांनी लावून धरलेत. बाळू धानोरकर हे आधी शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर ते कॅाग्रेसमध्ये गेले आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले. राज्यात कॅाग्रेसचे चे एकमेव खासदार होते. अशातच शुक्रवार, दिनांक 26 मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांना नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. ते उपचाराला प्रतिसाद देत असतानाच त्यांची मंगळवार 30 मे रोजी पहाटे प्राणज्योत मालवली. दोन दिवसाआधी कुटुंबाचा आधारवड पिता नारायण धानोरकर यांचे निधन झाले. आता पुन्हा अचानक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Balu Dhanorkar Passed Away) 'चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी' | खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक चंद्रपूर, आर्णी व वणी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळु धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त दु:खद व धक्कादायक आहे,त्यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभा क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,अशी शोकसंवेदना राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. ‘खासदार धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी आहे. लोकहितासाठी आक्रमक भूमिका घेणारे अशी खासदार धानोरकर यांची ओळख होती. दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तीनच दिवसांपूर्वी म्हणजे २७ मे रोजी खासदार धानोरकर यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर आज धानोरकर यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या परिवारावर जो दु:खाचा डोंगर कोसळला आहे, त्यातून त्यांना सावरण्याची प्रार्थना माता महाकाली चरणी करतो’, अशा शब्दात ना. श्री. मुनगंटीवार यांनी धानोरकर यांच्या प्रति श्रद्धांजली व्यक्त केली. *लढवय्या नेतृत्वाचा दुःखद अंत मनाला प्रचंड वेदना देणारा - माजी मंत्री, आ.वडेट्टीवार* चंद्रपूर - आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त आज सकाळी समजताच मन सुन्न झाले. गेल्या तीन दिवसांपूर्वी त्यांना पितृशोक झाल्याची माहिती कळली. पितृशोकाच्या दुःखाच्या डोंगरातून सावरण्यापूर्वीच खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना दिल्ली येथे हलवण्याची माहिती मिळाली. मात्र अतिशय जिगरबाज व लढाऊ वृत्तीचे असल्याने ते नक्कीच आरोग्य तक्रारीच्या विळख्यातून बाहेर पडून पुन्हा स्वस्थ होणार अशी आशा होती. मात्र नियतीने काळाचा घाला घालत धानोरकर कुटुंबीयांवर आघात केला व महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे दुःखद निधन झाले. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाचा लढवय्या शिपाही म्हणून त्यांची ओळख होती. जनतेच्या हितासाठी राबणारा लढवय्या नेता अचानक आपल्यातून गेल्याने काँग्रेस पक्षासह जिल्ह्याच्या सर्वसामान्यांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे. चंद्रपूर - आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन म्हणजे मनाला दुःखद वेदना देणारी व काळजाला चटका लावणारी घटना आहे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षासह जिल्ह्याच्या राजकारणात मोठी हानी झाली असून राजकारणातील एक लढवय्या नेतृत्व हरपले.अशा दुहेरी दुःखद संकट प्रसंगी संपूर्ण धानोरकर कुटुंबीयांच्या आम्ही पाठीशी असून या दुःखातून सावरण्यासाठी धानोरकर कुटुंबीयांना बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धाडस व आत्मविश्वासाने कार्यरत असलेला राजनेता गमावला - हंसराज अहीर चंद्रपूर/यवतमाळ :- चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचे अकाली दुःखद निधनामुळे जिल्ह्याच्या राजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे. अत्यंत उमेदीच्या काळात त्यांचे अल्पवयात आकस्मिक जाणे ही घटना धक्कादायक व मन विषन्न करणारी असल्याची शोक संवेदना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराजजी अहीर यांनी व्यक्त केली आहे. लोकसभेच्या निवडणुक काळामध्ये शिवसेनेत कार्यरत असतांना त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले. ते निर्भिड व स्पष्टवक्ते होते. त्यामुळे धाडसी वृत्ती व आत्मविश्वासाने कार्य करणारा राजकीय नेता आपण गमावला असल्याचे दुःख आहे. त्यांच्या कुटूंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो व मृतात्म्यास ईश्वर शांती प्रदान करो असेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे. ------------------- युवा कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व हरपले.
राज्यातील काँग्रेसचे एकमेव आणि तरुण खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या आकस्मिक निधनामुळे मन सुन्न झाले. अफाट जनसंपर्क, मनमिळावू स्वभाव, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांचे जाळे यामुळे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्रात चंद्रपूर लोकसभेतून विजय मिळवून दिला होता.
युवक काँग्रेससह NSUI मधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांनी नेहमी बळ देण्याचे काम केले. जनतेच्या प्रश्नावर जागरूक राहून ते सोडविण्यासाठी कटिबद्ध असलेला लोकनेता आता आपल्यात नाही हे स्वीकारायला मन धजावत नाही.
त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली तसेच या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, त्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, हीच प्रार्थना. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे कॉंग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. चंद्रपूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनानं जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं तरुण नेतृत्व आपण गमावलं आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची, महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं, अत्यवस्थ होणं आणि दोन दिवसांत त्यांच्या निधनाचे वृत्त येणं, हे सारं अकल्पनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे. राजकीय कारकिर्द बहरास येत असताना ऐन उमेदीच्या काळात त्यांचं अकाली निधन प्रत्येकाला अस्वस्थ करणारं आहे.
खा. बाळूभाऊ धानोरकर आमचे एक सक्षम, उर्जावान सहकारी होते, संवेदनशील, कर्तव्यदक्ष व सतत कार्यमग्न असे लोकप्रतिनिधी होते. जमिनीशी नाळ जुळलेले, दांडगा जनसंपर्क आणि सार्वजनिक प्रश्नांची जाण असलेले नेते म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या चेहर्यावर सदोदित दिसणारे हास्य, आपुलकीने बोलणं नेहमी स्मरणात राहिल. खा. बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन माझ्यासाठी वैयक्तिक हानी आहे. या दुःखद क्षणी आम्ही सर्व त्यांच्या कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. चंद्रपूरचे तरुण खासदार आणि आमचे मित्र श्री. बाळू धानोरकर यांच्या अकस्मात निधनाने एक लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सतत जागरूक असणारे आणि प्रसंगी त्यासाठी आक्रमक होणारे धानोरकर हे असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते. चंद्रपूरचे तरुण खासदार आणि माझे जिवलग मित्र श्री. बाळू धानोरकर यांच्या अकस्मात निधनाने एक लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सतत जागरूक असणारे आणि प्रसंगी त्यासाठी आक्रमक होणारे धानोरकर हे असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते.
हा तरुण लोकनेता आता आपल्यात नाही. हे दुःखद वास्तव स्वीकारायला मन अजूनही धजावत नाही. बाळू धानोरकर यांच्या अकाली जाण्याने मी माझ्या कुटुंबातील सदस्य गमावला आहे.
त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना .
-------- चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार सुरेश नारायण उर्फ बाळू धानोरकर यांचे निधन झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. ईश्वर त्यांना सदगती देवो. आम्ही धानोरकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. ------ काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर (४८) यांचं उपचारादरम्यान निधन झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
धानोरकर कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. ईश्वर त्यांना हे दुःख पचविण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना! ----- चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
या कठीण प्रसंगी आम्ही धानोरकर परिवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. *लोकप्रिय खासदार बाळू धानोरकर यांची प्राणज्योत मालावली*
*आज वरोरा येथे अंत्यदर्शन उद्या अंत्यसंस्कार*
*समर्पित सेना कार्यकर्ता ते काँग्रेस खासदार केला प्रवास*
चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते.… --- चंद्रपूरचे खासदार आणि माझे मित्र बाळू धानोरकर जी यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. प्रतिभा वहिनी आणि धानोरकर कुटुंबीयांना या दुःखद प्रसंगातून सावरण्यास ईश्वर बळ देवो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली! ----- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. आपल्या भागात लोकांच्या हितासाठी आंदोलने करत आणि संघटनात्मक बांधणी करत त्यांनी मने जिंकली. मी चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्कमंत्री असताना कायम त्यांच्या भेटीचा योग येत असे. जिवाभावाचा मित्र गमावला : खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
कॉंग्रेसचे खासदार, माझा जिवाभावाचा मित्र बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद व धक्कादायक आहे. त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते बरे होतील अशी आशा होती, परंतु ते शक्य झाले नाही.
सामान्य जनतेबद्दल आपुलकी, कळवळा असणारे बाळूभाऊ हे अतिशय उमदे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने एक चांगला मित्र मी गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण धानोरकर कुटुंबियांसोबत आहेत. ------------------ मागील अपडेट 30 may 3 AM : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते मात्र मंगळवारी पहाटेच्या सुमारास त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. ही घटना अत्यंत दुखत असून, राजकीय क्षेत्रात धक्कादायक ठरली आहे. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून नागपूर मार्गे वरोरा येथे दुपारी आणण्यात येणार आहे, येथे दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी वणी वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आहे. 29 May 8PM- सात वर्षांपूर्वी खासदार धानोरकर यांनी ‘वेट लॉस’साठी एक ऑपरेशन केले होते. त्या ऑपरेशनमुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन झाले होते. कृत्रिम श्वासावर ठेवण्यात आले आहे. प्रकृतीची माहिती कळताच खासदार बाळू धानोरकरांची मुलेही दिल्लीस रवाना झााले. आज त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, त्यांचं शरीर उपचाराला साथ देत असून सध्या त्यांचं ऑक्सिजन लेव्हल वाढलं आहे. (MP Balu Dhanorkar Health Update)
|
Balu Dhanorkar
28 May 12.20PM- चंद्रपूर (Chandrapur ) लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांची प्रकृती बिघडली असून, त्यांच्यावर दिल्ली येथे उपचार सुरू आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना पोटाचा आजार आहे. त्यासाठी ते नियमित उपचार करीत होते. मात्र, सततची धावपळ आणि कामाच्या ताणतणावामुळे त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली आहे. त्यामुळे त्यांना एअर ॲम्बुलन्सच्या (AIR Ambulance) माध्यमातून दिल्ली येथे हलवण्यात आले. 28 May 2.20PM- मेदांता हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. दरम्यान Khabarbar Live News ला सोमवारी पहाटे मिळालेल्या माहितीनुसार खासदार बाळू धानोरकर यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार केले जात आहे. 29 May 9.20AM- जाहीर सूचना व आवाहन चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. बाळू धानोरकर साहेब यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्यावर दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे समाज माध्यमावर कोणतीही अफवा पसरवू नये. शिवाय कोणत्याही मॅसेजवर विश्वास ठेवून भयभीत होऊ नये. मा. खासदारांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन निरोगी आरोग्य लाभावे, यासाठी प्रार्थना करूया. - खासदार बाळू धानोरकर यांचे जनसंपर्क कार्यालय, चंद्रपूर After infection in stomach and feelings diginess Congress MP balu dhanorkar shifted to medanta hospital @medanta gurugram from nagpur today. His office said in brief note, his condition is stable but nothing to worries. @BalubhauOffice @mlapratibhatai @INCMaharashtra Hindi | लोकसभा क्षेत्र के सांसद सुरेश उर्फ बालू धानोरकर (Balu Dhanorkar) की हालत बिगड़ गई है और उनका दिल्ली में इलाज चल रहा है. वह पिछले कुछ दिनों से पेट की बीमारी से पीड़ित हैं। Chandrapur Lok Sabha Constituency | MP Suresh alias Balu Dhanorkar's | 28 May 9.20AM- चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून राजकीय आणि सामाजिक घडामोडी घडत असतानाच कौटुंबिक दुःखद घटना घडली. त्यामुळे त्यांच्या मनावर आघात झाला आहे. परिणामी प्रकृती बिघडली आहे.
APMC कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकानंतर झालेला वाद, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे (CDCC) अध्यक्ष संतोष सिंग रावत (संतोषसिंग रावत गोळीबार) यांच्यावर झालेला गोळीबार, त्यानंतर पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर(Pratibha Dhanorkar) यांचे भाऊ प्रवीण काकडे (pravin kakade) यांना चौकशीसाठी पाठवलेली ED नोटीस आणि आता काल वडील नारायण धानोरकर यांचे निधन (चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या घरी दुखवटा | Narayan Dhanorkar) या सर्व घटनांमुळे ते अस्वस्थ आहेत. रविवारी त्यांना एअर ऍम्ब्युलन्सने मेदांता हॉस्पिटल (http://www.medanta.org/) दिल्लीला रवाना करण्यात आले. शनिवारी त्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. त्यांच्या वडिलांच्या पार्थिवावर आज सकाळी त्यांच्या मूळ गावी चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती येथे अत्यसंस्कार करण्यात आले. काल संध्याकाळपासूनच बाळू धानोरकर यांना अस्वस्त वाटत होतं. त्यामुळे त्यांना नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. 28 May 4.20PM-
Latest News Update
चंद्रपूर काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बदलले | Chandrapur District Congress आज भाजपच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत विधायक बैठक झाली. विकासाला गती देण्यासाठी आणि आमच्या नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्याच्या मार्गांवर चर्चा केली. त्यांनी भेटीदरम्यान त्यांच्या मौल्यवान अंतर्दृष्टी देखील सामायिक केल्या. Had a constructive meeting with BJP CMs and Deputy CMs today. We discussed ways for accelerating development and ensuring the welfare of our citizens. They shared their valuable insights during the meeting as well.
|