Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी १९, २०२०

शिवनेरी विकास कामासाठी 23कोटी रुपयांचा निधी देणार #ajitpawar



उपमुख्यमंत्री अजित पवार
जुन्नर दि.19 फेब्रुवारी किल्ले शिवनेरी व परिसर विकासाकरिता तेवीस कोटी रुपयांचा निधी देणार बरोबर गडावरील शिवसंस्कार सृष्टी आणि रोप वे उभारणीची कामे मार्गी लावू अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
       जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन आवारात आयोजित शिवजंयती उत्सव कार्याक्रमांत ते बोलत होते या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ,कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील ,सार्वजिनक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ,पर्यटन व माहिती जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे,खासदार डॉ.अमोल कोल्हे,आमदार सर्वश्री अतुल बेनके दिलीप मोहिते जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सौ.निर्मलाताई पानसरे,पी.डी.सी.सी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात ,कृषीउत्पन बाजार समिती सभापती संजय काळे,विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पुणे जिल्हाच्या सर्वांगीण‍ विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही यासाठी  जिल्हाचा 650कोटी रु.चा वार्षिक आराखडा तयार केला आहे .जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शिवनेरी विकासासाठी 23कोटी रु.चा निधी दिला जाईल .राज्याच्याआगामी अर्थ संकल्पात शेतकरी,सर्वसामान्य नागरिक व विदयार्थी याना केंद्रस्थानी ठेवून विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजने मध्ये यापुढे 2लाखावरींल  कर्जदार शेतकरी  व नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचा अंतर्भाव करण्यात येईल  
                                                   शालेय शिक्षण ,आंगणवाडया ,आरोग्य अशा अत्यावश्यक कामांसाठी दीड ते दोन टक्के व्याज दर आकारणाऱ्या जागतिक स्तरावरील वित्तीय संस्थाकडून निधी मिळवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगून श्री पवार म्हणाले ,शिवनेरी किल्यावर  राजमाता जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार ,शिक्षण  यांची माहिती सर्वांना घेण्यासाठी जिजाऊमाता ते शिवरायांच्या रोहिडेश्वरावरील स्वराज्याची शपथ या घटनाक्रमांवर आधारित शिवसंस्कार सृष्टी उभारण्यात येईल.  तसेच वयस्कांच्या सोयीसाठी  रोपवे उभारण्याकरिता सर्वेक्षणासाठी निधी दिला जाईल.
            अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले  छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जगापुढे येण्यासाठी किल्ले संर्वधन  महत्वाचे आहे. बॉस्टन विदयापीठात 'शिवाजी द मॅनेजमेंट गुरु' असा 100 गुणांची प्रश्नपत्रिका तर पाकिस्तानमध्ये पाठयपुस्तकांतून महाराज गौरवपर धडयाचा समावेश ही शिवप्रेमीसाठी अभिमानाची बाब आहे. शिवाजी महाराजांची लढाई ही कुणा धर्माविरुध्द नव्हती तर अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई होती.महाराजांचा कित्ता गिरवणे ही आजची गरज आहे
          यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले राजमाता जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे नैतिकतेचे आधिष्ठान दिले त्यामुळेच महाराजांच्या चरित्राचे गारुड आजही कायम आहे.
वयस्कर लोकांना शिवनेरी वर येण्यासाठी रोपवे उभारण्याची व शिवनेरीवर शिवसंस्कार सृष्टी उभारण्याची मागणी या प्रसंगी खासदार डॉ.अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांनी केली.
                                                     कार्यक्रमांप्रसंगी राष्ट्रपती पदक  विजेते माजी साहय्‍यक पोलिस आयुक्त वसंत ताजणे यांना शिवनेर भूषण पुरस्कार तर लाचलुचपत  प्रतिबंध विभागाचे  अप्पर पोलिस महासंचालक आशुतोष डुंबरे यांना छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्रयांचा हस्ते देण्यात आला.
                              सुरवतीला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जुन्नर मार्केट कमिटी शाखेचा नुतन शाखेचे   व एटीएम केंद्राचे उदघाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक आमदार अतुल बेनके यांनी केले.तर उपस्थितांचे आभार अशोक घोलप यांनी व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.