Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर १९, २०२२

सेवा पंधरवडा निमित्त जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विविध सेवांचे वितरण



पुणे दि.१८- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत भोर तालुक्यातील इंगवली येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते विविध सेवांचे वितरण करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार सचिन पाटील, गट विकास अधिकारी स्नेहा देव, विविध विभागाचे अधिकारी, इंगवली ग्रामस्थ उपस्थित होते.

उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करून जिल्हाधिकारी डॉ.देशमुख म्हणाले, कोविड कालावधी नंतर महसूल विभागात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत आयोजित केल्याने त्यातून प्रलंबित फेरफार निर्गमित करण्यात येऊन नागरिकांना विहित मुदतीत सेवा देण्यात येत आहे. सेवा हमी कामकाजामध्ये आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात दिलेल्या एकूण सेवांपैकी ९६ टक्के सेवा या वेळेत दिलेल्या आहेत. सेवा पंधरवड्यात देखील प्रशासनाकडून जास्तीत जास्त सेवा व प्रलंबित प्रकरणे निर्गमित करण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या २ ऑक्टोबरपर्यंत भोर उपविभागातील विविध गावात अशा शिबिराचे आयोजन करून नागरिकांच्या अर्जावर आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच त्यांना विविध सेवा स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. कचरे यांनी यावेळी दिली.

शिबिरात महसूल विभागाच्यावतीने लागवडीखाली आणलेल्या पोटखराब अ वर्ग क्षेत्राचे आदेश व सुधारीत ७/१२ , नवीन शिधापत्रिका व सुधारित मालमत्ता पत्रक आदी सेवांचे वितरण करण्यात आले.

#राष्ट्रनेता‌_ते_राष्ट्रपिता

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.