अक्षदा बाबेल व रतिलाल बाबेल उभयतांची
कवीता
जुन्नर /आनंद कांबळे
ग्रामोन्नती मंडळ, नारायणगाव येथील गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर नारायणगाव येथे गेली 30 वर्षांपासुन विज्ञान व गणित अध्यापनाचे कार्य रतिलाल बाबेल करीत असून दैनंदिन जीवनातील उपयुक्त मूलद्रव्यांची माहिती "कविता मुलद्रव्याची" या काव्यसंग्रहातून त्यांनी कवितेच्या रूपाने मांडली असून या कवितासंग्रहाला, जॅकी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड,इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, इंटर नॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, हावर्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडन यांचे पुरस्कार प्राप्त झाले असून नुकतीच या कवितासंग्रहाची "गिनीज बुक "मध्ये नोंद झाल्याची माहिती भारतातील मॅनेजर भाव्या शर्मा यांनी दिली आहे. मूलद्रव्यांच्या कविता मराठीतून करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचे डॉक्टर जे.के सोळंकी व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर निवास पाटील यांनी म्हटले आहे. रतिलाल बाबेल यांचा पुढील काही दिवसांत "कविता शास्त्रज्ञांची" हा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे.
सौ अक्षदा रतिलाल बाबेल यांना रांगोळी काढण्याचा छंद असून भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव चालू होता म्हणून "भारतीय तिरंग्याचा इतिहास" सन 1906 ते 1947 अशी नऊ बाय सात म्हणजे 63 स्क्वेअर फुटांची रांगोळी सलग 13 तास काढून गिनीज रेकॉर्ड केले आहे. या रांगोळीसाठी निळा, पांढरा,हिरवा, लाल, पिवळा, केशरी असे विविध 18 किलो रंग लागले आहेत.याची इनफ्लून्सर बुक ऑफ रेकॉर्ड व जीनियस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये अगोदर नोंद झाली आहे.
बाबेल दाम्पत्याची गिनीज बुक मध्ये नोंद झाल्याबद्दल संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मामा पाटे, कार्याध्यक्ष कृषिरत्न अनिलतात्या मेहेर, उपाध्यक्ष सुजितभाऊ खैरे, रवींद्रजी पारगावकर, डॉ. आनंद कुलकर्णी,स्वर्गीय रामचंदजी बाबेल ट्रस्ट चे अध्यक्ष जे.सी. कटारिया, ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सौ. माया कटारिया,बाबेल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी तसेच जुन्नर तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते व शिक्षक बंधू-भगिनींनी पुढील वाटचालीसाठी बाबेल दाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Oh wow! Record of Poetry in Guinness Book