जुन्नर /आनंद कांबळे
राष्ट्रीय स्थायी विकास संस्था (NISD) संगमनेर शाखा कोळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने
व मेट्रोपोलीस फाउंडेशन सपोर्ट सहित किशोरवयीन मुलींकरिता जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा, कोळवाडी , सितेवाडी, तळेरान, मढ, करंजाळे व खिरेश्वर या सात गावांमध्ये सदर प्रकल्प राबविण्यात येत आहे अशी माहिती संस्थेचे विजयकुमार शिंदे यांनी दिली.
दिनांक 25 आँगस्ट पासून मुलांकरिता लिंगभाव प्रशिक्षण व मुलींकरिता आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले जात आहेत त्यासाठी मुलींना निरोगी राहण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन डॉक्टर प्राची करपे करीत आहेत. सदर प्रशिक्षणामुळे मुलींना आरोग्य विषयी समस्यांचे निराकरण होत आहे तसेच मुलींना स्वतःचे संरक्षण करता यावे याकरिता डॉ. कर्पे यांनी स्वसंरक्षणाचे धडे देखील दिले आहेत तसेच मुलांकरिता निलेश पर्बत सर यांनी मुलांना लिंगभाव व स्त्री पुरुष समानता याबद्दल योग्य असे मार्गदर्शन करुन प्रत्येक मुलगी व स्त्रियांना आपण स्वतः मान देण्याकरिता पुढे येऊन तसेच मुलींचे संरक्षण करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा या मधून त्यांनी ऍक्टिव्हिटी च्या माध्यमातून खूप छान असे मार्गदर्शन केले .अशा प्रकारच्या प्रशिक्षणावेळी शाळेतून राष्ट्रीय स्थायी विकास संस्था यांचे स्वागत करण्यात आले. अशा प्रशिक्षणाची गरज शाळेला असल्याचे त्यांच्या बोलण्यातून येत आहे. या कार्यक्रमाच्या वेळेस एन.आय.एस.डी संस्थेचे दारोळे सर यांनी आभार मानले. शाळेचे मुख्याध्यापक दाते सर व संस्थेचे विजयकुमार शिंदे सर ,प्रणाली तांबे, मॅडम ,प्रियांका पानमळकर मॅडम उपस्थित होत्या. शाळेच्या वतीने आभार ज्ञानेश्वर सस्ते यांनी मानले .या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक यशवंत दाते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.