जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर येथील खानापुर गावाजवळील मानमोडी डोंगरावर असलेल्या अंबा अंबिका बुद्ध लेणीच्या संवर्धनासाठी जुन्नर तालुक्यातील तरुण दर रविवारी एकत्र येऊन संवर्धनाचे कार्य करत आहेत. जुन्नरला पर्यटनाचा दर्जा मिळुन देखील या लेणी संवर्धनासाठी पुरातत्व विभागा कडुन कोणतेही पाऊल उचललेले दिसत नाहीत.
रविवारी(ता.२९) सकाळी ३० तरुणांनी एकत्र येऊन लेणीतील टाक्या साफ करून लेणींच्या भिंतीवर लिहलेली नावे पुसण्याच काम केले तसेच लेणीच्या आवारातील कचरा साफ करून लेणी वर जाण्यासाठी ज्या ठिकाणी घसरण आहे तिथे दगडी पायऱ्या बनवायचे काम करण्यात आले.
यावेळी जुन्नरचे लेणी अभ्यासक सिद्धार्थ कसबे यांनी सांगितले की दोन हजार वर्षां पुर्वी सातवाहन राजांनी निर्माण केलेल्या या बुद्ध लेण्या जुन्नरच वैभव असुन ते संवर्धित करणे जुन्नरकरांच कर्तव्य आहे.कारण या लेण्या कोरण्यात आपल्या पूर्वजांनीच हातभार लावलेले आहेत.हजारो वर्षे या लेण्यां मधुन बौद्ध भीखु बुध्दांची शिकवण जगाला देत होते. अगदी ग्रीक लोकांनीही या लेण्या कोरण्यासाठी त्यावेळेस दान दिल्याचे उल्लेख येथील शिलालेखात आहेत. अंबा अंबिका लेणी कोरण्यासाठी गुजरातच्या भरुच बंदरावरील लाकडाचे व्यापारी बुद्ध रक्षित व बुद्ध मित्र यांनी दान दिल्याचे उल्लेख येथील शिलालेखात आहेत.
महाराष्ट्रात चाललेली लेणी संवर्धन चळवळ व दैनिक सकाळने जुन्नरच्या लेण्यां संदर्भात वारंवार केलेल्या वार्तांकना मुळे आम्ही या लेण्या संवर्धित करण्यासाठी एकत्र आलो असल्याचे प्रीतम करंदीकर यांनी सांगितले.
पुरातत्व विभागाने या लेणी संवर्धन करण्यासाठी कार्य करणे आवश्यक आहे तसेच यापुढेही जुन्नरच्या सर्व लेण्यांवर आम्ही श्रमदान करणार आहोत असे नारायणगावचे सामाजिक कार्यकर्ते गणेश वाव्हळ यांनी सांगितले.
यावेळी विकास वाव्हळ, ऊमेश वाघमारे,किरन दारोळे, पंकज खरात,शेखर डबडे,बाळा वाव्हळ, प्रितम करंदीकर,अक्षय वाव्हळ,गणेश सोनवणे,संदीप ऊबाळे, देवेंद्र इंगळे,अक्षय खंङे,अजिंक्य कुलकर्णी,ॠषिकेश वाव्हळ,सतीश वाव्हळ,मंगेश वाघमारे,महेश फुलपगार,मधुकर पिसे ,साळवे,विशाल कसबे,महेश साळवे, साहिल कसबे,योगेश रोकडे, संतोष रणदिवे,निखिल रणदिवे,सनी ठोसर,प्रज्वल भालेराव, निहाल भालेराव आदी तरुण श्रमदानासाठी उपस्थित होते.
फोटो - अंबा अंबिका बुद्ध लेणीच्या प्रांगणात श्रमदान करण्यासाठी एकत्रित आलेले जुन्नरकर तरुण.